कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत कुरूळ येथे कृषी सप्ताह साजरा करण्यात आला. या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. कार्यक्रमाला कृषी सहायक उमेश उडाण, महेश सातपुते, सोमेश्वर जुआरे, पुरुषोत्तम बोदलकर, नीरज बोदलकर, भैय्याजी सातपुते, राजेंद्र बोदलकर, नामदेव सातपुते, स्वप्निल भोयर, रमेश बर्लावार आदी उपस्थित होते.
उत्पन्न वाढीसाठी ॲझोला वनस्पती फायदेशीर आहे. ही वनस्पती थोड्या अन्नावर उत्तम प्रकारे वाढते. धान व दूध उत्पादनासाठी या वनस्पतीचा वापर करता येताे, तसेच सेंद्रिय शेती करण्याच्या दृष्टीने बाेरू, ढेंचा, गिरीपुष्प आदी वनस्पतींचे हिरवळीचे खत फायदेशीर आहे, असे कृषी सहायक उमेश उडाण यांनी सांगितले. धान लागवडीसाठी श्री पद्धत, पट्टा पद्धत, सगुणा पद्धतीचा अवलंब करावा. निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बीजप्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता तपासणे, जमीन आरोग्य पद्धतीनुसार खतांचा वापर, बहू पीक पद्धत, गट शेती, फळबाग लागवड आदी विषयांवर उडाण यांनी मार्गदर्शन केले.