नगरी येथे प्रमाेद म्हशाखेत्री यांच्या शेतावर बीबीएफ तंत्रज्ञानाने धान व साेयाबीन पेरणी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी प्रदीप वाहने, कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ ज्ञानेश्वर ताथाेड, ग्रामपंचायत सदस्य अजय म्हशाखेत्री, कृषी सहायक ए. आर. चाैधरी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जगदीश जिरीत्कार व शेतकरी उपस्थित हाेते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रदीप वाहने यांनी रासायनिक खते बचत माेहीम, ए. गाव ए. वाण, एकात्मिक कीड व्यवस्थापन, बीज प्रक्रिया माेहीम, शेतमालासाठी बाजारपेठ उपलब्ध करणे याविषयी मार्गदर्शन केले. २१ जून ते १ जुलै या कालावधीपर्यंत कृषी संजीवनी सप्ताह पाळला जाणार आहे.
बाॅक्स .... ए. गाव, ए. वाण लागवड करा
शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करून गावानुसार ए. गाव, ए. वाणाची लागवड केल्यास कीडराेग व्यवस्थापनासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच उत्पादित वाणाला याेग्य बाजारपेठ उपलब्ध हाेईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी ए. गाव ए. वाणावर भर द्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी वाहणे यांनी केले.