शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

सिंचन विहिरींचे अनुदान रखडल्याने शिवणीतील शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 12:26 AM

मागेल त्याला सिंचन विहीर या धडक सिंचन विहीर कार्यक्रमातून आरमोरी पंचायत समिती अंतर्गत शिवणी बूज येथील शेतकऱ्यांना विहीर मंजूर झाली. लाभार्थी नारायण पत्रे, गुरूदेव पत्रे, पंढरी राऊत, पंकज सपाटे........

ठळक मुद्देसंपूर्ण अनुदान द्या : बोअरवेल मारण्याची प्रशासनाकडून सक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : मागेल त्याला सिंचन विहीर या धडक सिंचन विहीर कार्यक्रमातून आरमोरी पंचायत समिती अंतर्गत शिवणी बूज येथील शेतकऱ्यांना विहीर मंजूर झाली. लाभार्थी नारायण पत्रे, गुरूदेव पत्रे, पंढरी राऊत, पंकज सपाटे, ज्ञानेश्वर मातेरे, तेजराव बोरकर, श्यामराव पत्रे व विठोबा भर्रे आदी आठ लाभार्थ्यांनी सन २०१६-१७ या वर्षात सिंचन विहिरीचे बांधकाम पूर्ण केले. मात्र अद्यापही बोअरवेलचे देयक प्रलंबित आहे. त्यामुळे सदर लाभार्थी शेतकरी अडचणीत सापडले आहेत.मागेल त्याला सिंचन विहीर योजनेंतर्गत बोअरवेल व सिंचन विहिरीचे संपूर्ण अनुदान अदा करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी लाभार्थी शेतकºयांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आरमोरीचे संवर्ग विकास अधिकारी कोमलवार यांना निवेदन दिले.शिवणी बूज गावातील पाणी पातळी ३५ ते ४० फुट खोल आहे. त्यानंतर रेती लागत असल्याने बोअर मारायला जमत नाही. योजनेच्या नियमानुसार ४० ते ५० फुट पेक्षा विहिरीची खोली अधिक झाली आहे. त्यामुळे शासनाच्या निधीपेक्षा यासाठी अधिकचा खर्च आला आहे.शिवणी बूज परिसरात पाणी पातळी चांगली असल्याने लवकरच विहिरीला पाणी लागले. त्यामुळे येथे बोअर मारण्याची मुळीच गरज नाही. त्यामुळे या शेतकºयांनी विहीर अधिक खोल खोदली. असे असतानाही आता सदर विहिरीमध्ये बोअर मारण्याची सक्ती प्रशासनाकडून केली जात असून बोअर न मारल्यास बोअरचे अनुदान कपात करण्याचा इशारा प्रशासनाने या शेतकºयांना दिला आहे. त्यामुळे शिवणी बूज येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. या समस्येला घेऊन त्यांनी बीडीओंची भेट घेतली.