लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एटापल्ली तालुका काँग्रेसच्या नेतृत्वात गुरूवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राजीव गांधी हायस्कूलमधून निघालेल्या मोर्चात एटापल्ली तालुक्यातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे एटापल्ली तालुक्यातील काही बाजारपेठसुद्धा बंद होती.मोर्चाचे नेतृत्व विधानसभा उपगटनेते आ.विजय वडेट्टीवार, प्रदेश सरचिटणीस सगुणा तलांडी, माजी आ.पेंटारामा तलांडी, जि.प.सदस्य अॅड.राम मेश्राम, डॉ.नितीन कोडवते, एटापल्ली तालुका काँग्रेस अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, नगराध्यक्ष दीपयंती पेंदाम, उपाध्यक्ष रमेश गम्पावार, जिल्हा परिषद सदस्य रवी शहा, अहेरीचे तालुकाध्यक्ष मुस्ताक हकीम यांनी केले.पावसाने दडी मारल्याने तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एटापल्ली तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून प्रत्येक कुटुंबाला अन्नधान्य उपलब्ध करून द्यावे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅसचे दर कमी करावे, रेशनसाठी अनुदान न देता धानाचे वितरण करावे, प्रलंबित वनहक्क दावे त्वरित मंजूर करावे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, वृद्ध व निराधार नागरिकांना ९०० रूपये मानधन द्यावे, नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांना घरकूल, शेततळे, सिंचन विहिरींचा लाभ द्यावा, धान्य खरेदी केंद्र सुरू करावे, जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विज्ञान शाखा सुरू करावी, पिपली बुर्गी येथे आरोग्य केंद्र सुरू करावे, केरोसीनचे परवाने व वनगौन खरेदी-विक्रीचे अधिकार महिला बचतगटांना द्यावे, रिक्तपदे भरावी, तालुक्यातील रस्त्यांची दुरूस्ती करावी, राष्ट्रीयकृत बँकांची संख्या वाढवावी, गट्टा व कसनसूर येथे ३३ केव्हीचे वीज केंद्र सुरू करावे, ग्रामीण भागात बससेवा सुरू करावी, वाळू घाटांचा लिलाव करावा, तेंदूपत्ता मजुरांची थकीत महसुली रक्कम मिळवून द्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. मागण्यांचे निवेदन एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. मोर्चादरम्यान सभेचे आयोजन करण्यात आले.सभेदरम्यान मार्गदर्शन करताना आ.विजय वडेट्टीवार यांनी विद्यमान भाजपा सरकारवर टीका केली. शासनाने दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे नागरिकांची प्रगती होण्याऐवजी अधोगती झाली आहे, असा जाब विचारला.एसडीएम व वडेट्टीवार यांच्यात बाचाबाचीआ.विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी एटापल्लीचे एसडीएम एस.ए.थेटे यांना निवेदन देण्यासाठी गेले. यावेळी उभे राहून निवेदन स्वीकारा, अशी सूचना वडेट्टीवार यांनी एसडीएम यांना दिली. मात्र एसडीएमने उभे राहून निवेदन स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून एसडीएम व वडेट्टीवार यांच्यात चांगलीच शाब्दीक चकमक उडाली. पाच पेक्षा जास्त व्यक्ती आतमध्ये कसे आले, असा प्रश्न एसडीएमने उपस्थित केला. तर एसडीएम उभे न राहिल्यामुळे हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभेत टाकला जाईल, अशी तंबी एसडीएम यांना दिली. त्यानंतर एसडीएमने कार्यालयासमोर येऊन निवेदन स्वीकारले. यावेळी एसडीएम यांना लोकमतने विचारणा केली असता, आयोजकांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारावे, असे आपल्याला सांगितले असते तर आपण त्यासाठी तयार होतो. कार्यालयात पाच पेक्षा अधिक व्यक्ती येणे हे कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगितले.
एटापल्लीत शेतकऱ्यांची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 11:50 PM
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एटापल्ली तालुका काँग्रेसच्या नेतृत्वात गुरूवारी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राजीव गांधी हायस्कूलमधून निघालेल्या मोर्चात एटापल्ली तालुक्यातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
ठळक मुद्देकाँग्रेसचे नेतृत्व : एसडीओ कार्यालयावर मोर्चा