सुरेश भोयर यांचे आवाहन : भेंडाळात शेतकरी मेळावा; प्रमोद भगत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्येचामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सोयाबीनला उत्पादन खर्चाइतकाही भाव मिळत नाही. अती पावसामुळे धानपिकाचे नुकसान झाले. पीकविमा काढूनही विम्याची रक्कम मिळत नाही. धान, कापसाला भाव नाही. शेतमजुराच्या हाताला काम नाही. शेतकरी, शेतमजूर विरोधी शासनाच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला धडा शिकवा, असे आवाहन काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा प्रदेश निरीक्षक सुरेश भोयर यांनी केले. चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे बुधवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी होते. उद्घाटक म्हणून माजी खा. मारोतराव कोवासे तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, माजी आमदार आनंदराव गेडाम, आरमोरी विधानसभा मतदार संघाचे निरीक्षक डॉ. भगत, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, पं.स. सदस्य अमिता मडावी, जि.प. सदस्य केसरी उसेंडी, हसनअली गिलानी, चामोर्शीच्या नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, सभापती विजय शातलवार, सुमेध तुरे, नगरसेवक वैभव भिवापुरे, मंदा सरपे, माजी तालुकाध्यक्ष राजेश ठाकूर, तालुकाध्यक्ष निशांत नैैताम, पं. स. सदस्य रूपाली निखाडे, कल्पना कोडापे, नीलकंठ निखाडे, सुरेश भांडेकर उपस्थित होते. कार्यक्रमात घारगाव, दोटकुली, फोकुर्डी, एकोडी, वेलतूर तुकूम, कान्होली, वाकडी येथील सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी तसेच खंडाळा, वाघोली, चाकलपेठ, सगणापूर येथील भाजप कार्यकर्ते व प्रमोद भगत यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. प्रवेशित कार्यकर्त्यांचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमोद भगत यांनी आपली पत्नी कविता भगत यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश करून काँग्रेसला बळकट करण्याचे आवाहन केले. दरम्यान वेलतूर तुकुमचे सरपंच धानोरकर, जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, डॉ. भगत, माजी आ. आनंदराव गेडाम, माजी खा. मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष निशांत नैैताम, संचालन भाविक रापर्तीवार तर आभार तुषार मंगर यांनी मानले. यावेळी परिसरातील शेतकरी, शेतमजूर व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांनो, भाजपला धडा शिकवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2016 2:27 AM