शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

जनावरे विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:39 AM

वाहनतळ नसल्याने नागरिकांना त्रास देसाईगंज : शहरात खासगी रुग्णालये आहेत. मात्र, यातील बहुतांश रुग्णालयांमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही. नगर परिषद ...

वाहनतळ नसल्याने नागरिकांना त्रास

देसाईगंज : शहरात खासगी रुग्णालये आहेत. मात्र, यातील बहुतांश रुग्णालयांमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही. नगर परिषद प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

ग्राहकांची लूट थांबवावी

आरमाेरी : लहान-मोठ्या विक्रेत्यांकडून सर्रासपणे ग्राहकांची लूट सुरू आहे. यावर आळा घालण्यासाठी ग्रामीण, तसेच शहरी भागात विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.

मध संकलनातून राेजगार

आलापल्ली : जिल्ह्यात मध संकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मध संकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सेवायोजन कार्यालय कूचकामीच

गडचिरोली : पूर्वी येथील सेवा योजन कार्यालयातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी मुलाखत पत्र पाठविण्यात येत होते. मात्र, ऑनलाईन नोंदणी झाल्यामुळे बेरोजगार नोंदणी करण्यासाठी कार्यालयात येत नाहीत.

उपकेंद्रांना इमारती नाहीत

गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे. परिणामी दुर्गम भागात नागरिकांना त्रास हाेताे.

साखरा बसथांब्यावर गतिरोधक उभारा

गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने साखरा येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधकाअभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत.

ग्रामपंचायत संगणक योजनेचा बोजवारा

सिरोंचा : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनतेची कामे तत्काळ व्हावी, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायतींना संगणक संच पुरविले. मात्र, अनेक संगणक नादुरुस्त स्थितीत असून, काही धूळ खात आहेत. परिणामी ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन कामाचा बोजवारा उडाला आहे.

चामोर्शीतील तलावाचे सौंदर्यीकरण करा

चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही, त्यामुळे शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. तलावालगत काही नागरिकांनी शेणखताचे ढिगारे ठेवले आहेत.

शासकीय विहिरीवर खासगी पंपांचा कब्जा

काेरची : तालुक्यातील अनेक शासकीय विहिरींवर खासगी पाणी पंप लावण्यात आले आहेत. मात्र, याबाबत ग्रामीण भागातील नागरिक तक्रार करीत नाहीत. ग्रामपंचायतीने स्वत: दखल घेऊन अशा प्रकारच्या अवैध मोटार काढणे आवश्यक असतानाही दुर्लक्ष आहे.

परवानगीविनाच घरांचे बांधकाम वाढले

देसाईगंज : नगर परिषद क्षेत्रात घराचे बांधकाम करायचे असेल तर नगर परिषदेकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते. मात्र, शहरातील बहुतांश घरमालक नगर परिषदेकडे परवानगी न घेताच घरांचे बांधकाम करीत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. नगर परिषदेने कारवाई करण्याची गरज आहे.

मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना धोका

भामरागड : दिवसेंदिवस शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगर पंचायतीची आहे. स्थानिक नागरिकांनी या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी आहे.

इमारतीचा अभाव

गडचिरोली : जिल्हाभरातील १०० वर अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. त्यामुळे या अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरविल्या जात आहेत. लहान व कौलारू खोलीत अंगणवाडी चालविली जात आहे. बहुतांश मिनी अंगणवाड्यांना इमारती नाहीत.

खड्ड्यांचे साम्राज्य

अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील मुख्य मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून आसरअल्लीदरम्यानच्या गावातील नागरिक ये-जा करीत असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी.

पुलाचा प्रश्न कायमच

गडचिरोली : ब्रिटिश काळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील आष्टीचा पूल ठेंगणा व अरुंद असल्यामुळे या पुलावरून वाहन कोसळून बळी गेला आहे.

कठड्यांअभावी वृक्षसंवर्धन धोक्यात

एटापल्ली : तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी वृक्षारोपण केले आहे. मात्र, या वृक्षांचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी कठडे बांधण्यात आले नाही. लावलेले वृक्ष जनावरांचे खाद्य बनत चालले आहे.

एलईडी बल्ब पुरविण्याची मागणी

धानोरा : दोन वर्षांपूर्वी धानोरा तालुक्यात वीज विभागामार्फत एलईडी बल्बचा पुरवठा करण्यात आला होता. चार ते पाच हप्त्यांमध्ये रक्कम भरण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. एलईडी बल्ब पुरविण्याची मागणी होत आहे.

बॉयोमेट्रिक मशीन बंद, कर्मचारी बिनधास्त

कोरची : शासकीय कार्यालयात कर्मचारी, अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहावेत, याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बॉयोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. मात्र, काळाच्या ओघात अनेक कार्यालयांतील मशीन बंद आहेत.

धानोरा येथील जीर्ण विद्युत खांब बदला

धानोरा : तालुका मुख्यालय असलेल्या धानोरा येथील अनेक वॉर्डांतील अनेक विद्युत खांब जीर्ण अवस्थेत असून, ते कोसळण्याच्या मार्गावर आहेत. या जीर्ण खांबांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.

गृहरक्षकांना पेन्शन लागू करण्याची मागणी

गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या ३० वर्षांपासून अनेक नागरिक गृहरक्षक पदावर काम करीत आहेत. गृहरक्षकांना १ एप्रिल २०१४ पासून ४०० रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला. मात्र, गृहरक्षकांना बारमाही रोजगार मिळत नाही. वर्षातून केवळ सहा महिनेच रोजगार दिला जातो. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तुकुम येथे पसरली अस्वच्छता

धानोरा : तालुक्यातील तुकुम येथे सर्वत्र अस्वच्छता पसरली असल्याने गावात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. तुकुम येथील नाल्या पूर्णत: बुजल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. पाणी साचून राहत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.

गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांची होरपळ

गडचिरोली : गॅस सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्यात वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. सिलिंडरमध्ये दर महिन्याला वाढ होत असल्याने महिनाकाठी सिलिंडरची उचल करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच पंचाईत होत आहे. सरकारने सिलिंडरच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ केली. अनेकांची सबसिडीही बंद झाली आहे. अनेक नागरिक सरपणावरच स्वयंपाक करीत असल्याचे दिसून येत आहे.

शासकीय आश्रमशाळेतील सोलर वॉटरहिटर बंदच

कुरखेडा : आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी हिवाळ्यात अंघोळीसाठी गरम पाणी मिळावे यासाठी आश्रमशाळांना सोलर वॉटरहिटरचा पुरवठा करण्यात आला. मात्र, आश्रमशाळांतील सोलर वॉटरहिटर वापराअभावी बंदच असल्याचे दिसून येते.