अतुल बुराडे/विष्णू दुनेदार ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा/तुळशी : माती म्हणजे जमिनीची त्वचा. मानवी त्वचा प्रत्येक व्यक्ती मुलायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु मातीच्या संदर्भात ही मानसिकता मानवात दिसून येत नाही. माती प्रदूषण हा आता महत्वाचा विषय झाला आहे. पूर्वी शेतात प्रवेश करताच ढेकले फुटायची व पायाला मुलायमपणाचा भास व्हायचा परंतु आज मात्र हा मुलायमपणा जाणवत नसल्याचे अनुभवी शेतकरी सांगतात. रासायनिक खताच्या अतिवापराने मातीचा मुलायमपणा निघून गेला आहे. आज जागतिक मृदा दिनाच्या निमित्याने प्रतिनिधींनी शेतकºयांना विचारणा केली असता, हे वास्तव समोर आले आहे.माती परीक्षण हे शेतजमीनीतील अंगभूत रासायनिक व जैविक विश्लेषण होय. याद्वारे शेतात घेण्यात येणाºया पीक खर्चात बचत करुन उत्पादन वाढवता येते. सोबतच पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा निश्चित करता येते. गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. नत्र, पालाश, स्पूरद, तांबे, लोह, मॅग्नीज, जस्त या सारख्या पोषक द्रव्याचा व सुक्ष्म मुलद्रव्याचा शोध घेता येते. यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांना प्रोत्साहीत केल्या जाते. आजच्या काळामध्ये शेतकरी बांधव रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर करीत आहेत. शेतकरी बांधवांनी नेमका किती रासायनिक खत वापरला पाहिजे याचे कसलेही, कुठे काही बंधन नाही. त्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे.ज्या प्रमाणे मानवी रक्त चाचणीतून शरीरातील कमी जास्त असलेले विविध घटक तपासले जाते अगदी तसेच जमिनीला सुद्धा आरोग्य असून वेगवेगळे केमिकल्स वापरून मृदा परिक्षणाच्या पद्धतीने जमिनीतील सेंद्रिय कर्ब किती प्रमाणात आहे. हे तपासले जाते. यासाठी पीएच स्केलचा वापर केला जातो.मृदा परीक्षणासाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध शेत जमिनीच्या चारही कोपºयातील जिथे जनावरे बसत नाही, जिथे पाणी साचलेले नसते, जिथे क्षारयुक्त पाणी राहत नसलेल्या भागात व्ही आकाराचा खड्डा खोदून माती काढली जाते.मृदा परीक्षणासाठी गाव, तालुकास्तरावर प्रचार, जनजागृती केल्यामुळे जमीन आरोग्य अभियान पत्रिका योजनेला जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद लाभला आहे. जिल्ह्यात फळबाग कमी असल्याकारणाने सर्वसाधारण प्रकारचे मृदा परीक्षण केले जाते, यात नत्र, स्फुरद आणि पालाश यांची तपासणी केली जाते.मृदा परिक्षणासाठी मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकरी बांधवांचा कल वाढतो आहे. सन २०१६-२७ ला १९ हजार ७४४ शेतकºयांना मृदा परीक्षणाची नमुने प्राप्त झाले. सन २०१७-२८ यावर्षात १९ हजार ७४४ नमुन्यांचे परीक्षण झाले. तर २०१८-१९ या वर्षात २१ हजार ४ नमुन्यांची तपासणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.खर्चात कपात करण्यासाठी मृदा परीक्षण महत्त्वाचेमृदा परीक्षणाच्या माध्यमातून जमिनीत नत्र, स्फुरद, पालाश यासह इतर घटक नेमके किती प्रमाणात आहेत, याची माहिती मिळण्यास मदत होते. एखाद्या जमिनीत जर नत्र अधिक असतील तर शेतकरी पिकाला नत्राचे प्रमाण कमी देऊन खर्चात बचत करू शकतो. त्याचबरोबर जमिनीतील घटकद्रव्यानुसार पिकांची निवड करण्यास फार मोठी मदत होते. विशेष म्हणजे, मृदा परीक्षण अगदी मोफत करून दिले जाते. मृदा परीक्षणाचा अहवाल आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जातो. आरोग्य पत्रिकेवर असलेल्या नोंदीनुसार कोणत्या पिकाची लागवड करावी. खताच्या किती मात्रा द्याव्या याबाबत कृषी अधिकारी, कृषी सहायक यांचे मार्गदर्शन लाभण्यास मदत होते.शेतकरी बांधवांना कृषी विभागाकडून जी मृदा आरोग्य पत्रिका दिली जात आहे. मृदा आरोग्य पत्रिकेनुसार खताचा वा इतर घटकांचा संतुलित, समतोल असा वापर करावा. शेतकऱ्यांनी त्याचा भरपूर लाभ घ्यावा आणि आपल्या उत्पादनामध्ये दुपटीने वाढ करावी.- एन. जी. सुपारे,जिल्हा मृद सर्वेक्षण व चाचणी अधिकारी, गडचिरोली
मृदा चाचणीकडे वाढला शेतकऱ्यांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 10:56 PM
माती म्हणजे जमिनीची त्वचा. मानवी त्वचा प्रत्येक व्यक्ती मुलायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु मातीच्या संदर्भात ही मानसिकता मानवात दिसून येत नाही. माती प्रदूषण हा आता महत्वाचा विषय झाला आहे.
ठळक मुद्देजागतिक मृदा दिवस : आरोग्य पत्रिकांच्या माध्यमातून कळते जमिनीचे आरोग्य