शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
3
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
4
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
5
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
7
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
8
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
9
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
10
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
11
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
12
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
13
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
14
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
15
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
16
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
17
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
18
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
19
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
20
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द

दुष्काळ निधीची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच

By admin | Published: May 03, 2017 1:35 AM

२०१४-१५ या वर्षात अत्यंत कमी पाऊस झाल्याने कुरखेडा व कुंभीटोला या गावात प्रशासनाने सर्वे करून सदर गावे दुष्काळग्रस्त म्हणून ....

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कुरखेडा व कुंभीटोलातील शेतकरी वंचित कुरखेडा : २०१४-१५ या वर्षात अत्यंत कमी पाऊस झाल्याने कुरखेडा व कुंभीटोला या गावात प्रशासनाने सर्वे करून सदर गावे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केली होती. मात्र तीन वर्षांचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली नाही. आर्थिक मदत तत्काळ द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून शेतकऱ्यांनी केली आहे. कुरखेडा तालुका धान पिकावर अवलंबून आहे. रोजगाराचे इतर साधने उपलब्ध नसल्याने संसाराचा संपूर्ण गाडा धानपिकातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नावर चालतो. २०१४-१५ या वर्षात प्रशासनाने सर्वे केला. त्यावेळी कुरखेडा व कुंभीटोला येथील शेतकऱ्यांचे पीक पावसाअभावी करपले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही दोन्ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली. काही दिवसानंतर दुष्काळनिधीची ५० टक्के रक्क्म त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. उर्वरित रक्कम लवकरच जमा केली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र या बाबीला एक वर्षाचा कालावधी उलटला असला तरी अजूनही मदत मिळाली नाही. मतद तत्काळ द्यावी, अशी मागणी न. पं. सभापती आशा तुलावी, पं. स. सदस्य संध्या नैताम, मनोज सिडाम, नरेश नाकाडे, मनोहर उईके, बालकदास भानारकर, राजीराम देशमुख, गोपाळा चंदनखेडे, भास्कर देशमुख, विस्तारी भानारकर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)