लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दिवसेंदिवस सेंद्रिय खत मिळणे कठीण झाल्याने शेतकरी आता रासायनिक खतांकडे वळत आहे. शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत असते. सध्या २० हजार मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. सदर खत शेतकऱ्यांना वेळेवर व योग्य किमतीत उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे.
ग्रामीण भागात पूर्वी पशुपालन केले जात होते. आता मात्र पशुंची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे सेंद्रीय खताची निर्मिती होणे बंद झाली आहे. परिणामी रासायनिक खताचा वापर केल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय राहिला नाही. अपवाद वगळता बहुतांश शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात. रासायनिक खतांचा काळाबाजार होऊ नये, यासाठी कृषी विभागामार्फत विशेष लक्ष ठेवले जाते.
पीकनिहाय बियाणेपीक बियाणे (क्विंटलमध्ये) धान ३६,९६० तूर ४२०कापूस ४६४मका ६००एकूण ३८,४४४बियाणे
संकरीत बियाणे वाढले पूर्वी शेतकरी स्वतःकडचेच संपूर्ण बियाणे वापरत होते. आता मात्र खरेदी केलेले संकरीत बियाणे वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.