लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : शेतकऱ्यांना मोफत देण्यासाठी मिळालेल्या गायी प्रोग्रेसिव्ह फॉर्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने अजूनपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आल्या नसल्याने नाराज झालेल्या आरमोरी, देसाईगंज तालुक्यातील शेतकरी बांधवांची रविवारी आमगाव येथे बैठक पार पडली. बैठकीत आमच्या गायी आम्हाला देण्यात याव्यात अन्यथा उपोषण आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी बैठकीत दिला.प्रोग्रेसिव्ह फार्मस ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीला दिलेल्या गायी शेतकऱ्यांनाच वितरित करायच्या होत्या. मात्र कंपनीच्या संचालकांनी विविध कारणे दाखवून शेतकऱ्यांना गायी वितरित केल्या नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे, कंपनीचे संचालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन अटकही करण्यात आली. मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या गायी मिळाल्या नाही. देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील जवळपास ४० शेतकऱ्यांची सभा आमगाव येथे पार पडली. या सभेत कंपनीने आपल्याला गायी मोफत द्याव्या, यासाठी प्रशासनाने कंपनीच्या संचालकांना दबाव आणावा, असेही ठरविण्यात आले. गायी देण्यात न आल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. सर्वच सदस्यांचे आंदोलनाच्या मुद्यावर एकमत झाले.यावेळी हिरालाल अवसरे, भाग्यवान पारधी, राहुल रिठे, शंकर शेंडे, किसन मेश्राम, सुधाकर लाडे, विलास पिलारे, मारुती मस्के, बालाजी ठाकरे, शिल्पा ठाकरे, ज्ञानेश्वर परवते, सचिन ढोरे, देवराव लांजेवार, भोजराज नखाते, सिद्धार्थ ढवळे, वामन बोरकर, आशाबाई नाकतोडे, गुरुदेव कुथे, पटवारी दोनाडकर, संतगीर गिरी, वैजू बोदेले, विलास ठाकरे, ओमप्रकाश सहारे उपस्थित होते.
गार्इंसाठी शेतकरी आंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 6:00 AM
प्रोग्रेसिव्ह फार्मस ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीला दिलेल्या गायी शेतकऱ्यांनाच वितरित करायच्या होत्या. मात्र कंपनीच्या संचालकांनी विविध कारणे दाखवून शेतकऱ्यांना गायी वितरित केल्या नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे, कंपनीचे संचालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन अटकही करण्यात आली. मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या गायी मिळाल्या नाही.
ठळक मुद्देआमगावात पार पडली बैठक : ४० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती