लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकरी खातेदारांसह त्यांनी धारण केलेली एकूण शेतजमीन किती यासह शेतीविषयक विविध माहिती अंतर्भूत करण्यासाठी भारत सरकारची ॲग्रिस्टॅक संकल्पना राज्यात राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शेतकरी नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत १ लाख ४५ हजार २८८ शेतकरी खातेदारांनी नोंदणी केली आहे. शेतकरी नोंदणीमुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. सेतू केंद्रातून किंवा अन्य ऑनलाइन सुविधा केंद्रातून संकेतस्थळाचा वापर करून शेतकरी नोंदणी करू शकतात. शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताची आधार संलग्न माहिती संच, हंगामी पिकांची माहिती संच, भू संदर्भिकृत भूभाग असणारे गाव, नकाशे यांचा माहिती संच या बाबीचा समावेश यात आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी व्यापक प्रमाणात मोहीम राबविण्यात आली.
नोंदणी केली तरच मिळणार योजनांचा लाभअॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी केली तरच शेतकऱ्यांना कृषीविषयक विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. शासन त्यानुसार पुढील नियमावली किंवा ध्येयधोरण आखू शकते. अतिदुर्गम भागात मात्र यासाठी अडचणी आहेत
८२ टक्केनोंदणी अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत जिल्ह्यात झाली आहे. सर्वाधिक नोंदणी मुलचेरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
३० हजार शेतकरी बाकीजिल्ह्यात एकूण १ लाख ७५ हजार ३८४ शेतकरी खातेदारांपैकी १ लाख ४५ हजार २८८ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी केलेली आहे. अजूनही ३० हजार २६ शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे.