गडचिराेली : श्रावण महिन्यात बरेच जण साेमवार, मंगळवार, गुरुवार व शनिवारी उपवास करतात. नवरात्र उत्सव वगळता वर्षभराच्या तुलनेत श्रावणात सर्वाधिक उपवास केले जातात. परंतु गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या काेराेना महामारी व अन्य कारणांमुळे यावर्षी शेंगदाणे, साबुदाण्याच्या दरात प्रति किलाे १० ते २० रुपयांपर्यंतची दरवाढ झाली आहे. याचा फटका उपवास करणाऱ्या लाेकांना बसत आहे.
उपवासासाठी शेंगदाणे, साबुदाणा, भगर, रवा यांसह अन्य वस्तूंपासून तयार केलेल्या पदार्थांचा वापर केला जाताे. काेराेना लाॅकडाऊनमुळे मागील वर्षीपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वधारल्या. काही कालावधीत स्थिर हाेत्या. परंतु दुसऱ्या लाटेत पुन्हा दरवाढ झाली. सध्या श्रावणमास सुरू असल्याने शेंगदाणे व साबुदाण्याची मागणी वाढल्याने प्रति किलाेमागे १० ते २० रुपयांची दरवाढ झाली.
बाॅक्स...
भगरही वधारली
शेंगदाणे व साबुदाण्याच्या प्रति किलाे दरात १० ते २० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. या दाेन वस्तूंसह भगरीचाही वापर अनेक जण उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी करतात. त्यामुळे महिनाभरापूर्वी १०० रुपये प्रति किलाे असलेली भगर आता १३० रुपये प्रति किलाे विकली जात आहे. भगरीलाही बरीच मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडेही भगरीचा स्टाॅक राहत नाही. किरकाेळ विक्रेत्यांनाही नफा मिळताे.
बाॅक्स...
साबुदाणा
- दीड वर्षापासून काेराेनाचे संकट असल्याने आवश्यक प्रमाणात पुरवठा सुरुवातीला झाला नाही. व्यापाऱ्यांनी अल्पसाठा व पुरवठ्याचे कारण दाखवून दरवाढ केली. त्यानंतर ही दरवाढ कायम राहिली. साबुदाण्याची आवक जिल्ह्यात कमी प्रमाणात आहे.
शेंगदाणा
- गडचिराेली जिल्ह्यात शेंगदाण्याचे अल्प उत्पादन हाेते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालावर जिल्ह्यातच प्रक्रिया हाेत नाही. त्यासाठी व्यापाऱ्यांना शेतकरी माल विक्री करतात. त्यानंतर माेठ्या शहरांमध्ये माल जाऊन तेथे प्रक्रिया हाेते व पुन्हा बाजारपेठेत येते.
काेट...
प्रत्येक जीवनावश्यक वस्तूच्या किमती वधारल्या आहेत. माेठ्या व्यापाऱ्यांनी वस्तूंची दरवाढ केल्याने किरकाेळ व्यापाऱ्यांना त्याच किमतीत वस्तूंची विक्री करावी लागते. १० ते २० रुपयांपर्यंत झालेली दरवाढ इतर जीवनावश्यक वस्तूंच्या तुलनेत याेग्य आहे.
- सदाशिव माेरांडे, व्यावसायिक