शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

नदीतून जीवघेणा प्रवास

By admin | Published: August 03, 2014 12:05 AM

जवळील वांगेपल्ली येथुन महाराष्ट्र व आंध्रप्रदेशला जोडणाऱ्या प्राणहिता नदीवरुन डिझेल मशीनच्या डोंग्याने दररोज प्रवाश्यांची वाहतुक सुरु आहे. मात्र ही वाहतुक करताना कोणत्याच प्रकारची सुरक्षा

प्राणहिता नदीघाट : प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणीअहेरी : जवळील वांगेपल्ली येथुन महाराष्ट्र व आंध्रप्रदेशला जोडणाऱ्या प्राणहिता नदीवरुन डिझेल मशीनच्या डोंग्याने दररोज प्रवाश्यांची वाहतुक सुरु आहे. मात्र ही वाहतुक करताना कोणत्याच प्रकारची सुरक्षा उपलब्ध राहत नाही. त्यामुळे हा प्रवास अत्यंत जीवघेणा होत आहे. प्राणहिता नदीच्या वांगेपल्ली नदीघाटावरुन दररोज शेकडो प्रवाश्यांची ने-आण होत आहे. प्रत्येकी ४०-५० रुपये घेतल्या जाते. मात्र प्रवास करताना सुरक्षेची कोणतीच हमी राहत नाही. महाराष्ट्र व आंध्रप्रदेशच्या गुडेम येथील ठेकेदारांनी १५ ते २० हजार रुपये भरुन वाहतुकीचा ठेका घेतला आहे. मात्र सर्व नियम व अटी धाब्यावर बसविले आहे. सध्या प्राणहिता नदी दुथडी भरुन वाहत आहे. अचानक कोणता अपघात घडल्यास जीवितहानी होऊ शकते. कधी-कधी नावाडी मद्यप्राशनसुद्धा करुन डोंगा चालवित असतात. सुरक्षेबाबत लाईफ जॅकेटसाठी नावाड्यास विचारले असता लाईफजॅकेट आम्हाला माहित नाही. शिवाय कधी बघितले नाही, असे उत्तर मिळाले. मागीलवर्षी आंध्रप्रदेशची डीझेल मशीनची नाव नदीच्या मधोमध येऊन बंद पडली होती. तेव्हा खुप मोठा अपघात होण्यापासून वाचला होता. मात्र त्यातून नावाड्यांनी कोणतीच शिकवण घेतली नाही. प्रवाश्यांसोबत दुचाकीचीसुद्धा वाहतुक होते. त्यामुळे आणखीच समस्या उद्भवु शकते. मागील अनेक वर्षांपासून वांगेपली नदीघाटावर पूल बांधण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र या संबंधी लोकप्रतिनीधींनी दिलेले आश्वासन पूर्णपने हवेत वीरले आहे. या नदीवर पूल बनल्यास काजगनगर, मंचेरियाल, चेन्नुर सारख्या महत्त्वाच्या शहरात जाणे सोयीचे होऊ शकते व पैशांची, वेळेची बचत होऊ शकते. नदीला सध्या पूर आला असून अशीच विनासुरक्षा वाहतुक सुरु राहिल्यास काही अनुचित प्रकार घडु शकतो व जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने कडक नियम तयार करुन याबाबत नावाड्यांना सूचना दिल्या पाहिजे, अन्यथा भविष्यात अपघात व जीवितहानी अटळ आहे. (प्रतिनिधी)