दिनांक १५ जानेवारीला पहिल्या टप्प्यात जिल्ह्याच्या उत्तर भागातील ६ तालुक्यांमध्ये मतदान झाले. त्यात १७० ग्रामपंचायतींमध्ये २,५७८ उमेदवार रिंगणात होते. दुसऱ्या टप्प्यात दिनांक २०ला दक्षिण भागातील ६ तालुक्यांमध्ये मतदान झाले. त्यात १५० ग्रामपंचायतींमध्ये २,८१५ उमेदवारांनी निवडणूक लढली. पहिल्या टप्प्यात ८२.०६ टक्के, तर दुसऱ्या टप्प्यात ७८.०८ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मिळून सरासरी ८० टक्के मतदान झाले.
प्रत्यक्ष मतदान झालेल्या ३२० ग्रामपंचायतींमध्ये ४ लाख ७६ हजार ७७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये १ लाख ९६ हजार ९४० पुरूष, तर १ लाख ८४ हजार ५४६ महिला मतदार होत्या.
(बॉक्स)
देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक, तर भामरागडमध्ये सर्वात कमी मतदान
ग्रामपंचायत निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यातील मतदानाची अंतिम टक्केवारी पाहिल्यास जिल्हाभरात सर्वाधिक म्हणजे ८४.४९ टक्के मतदान देसाईगंज तालुक्यात झाल्याचे दिसून येते. या तालुक्यात पहिल्या टप्प्यात मतदान झाले असून, संवेदनशिल मतदान केंद्र नव्हते. सर्वात कमी म्हणजे ५३.७९ टक्के मतदान भामरागड तालुक्यात झाले आहे. या तालुक्यात दोनच ग्रामपंचायतीत निवडणूक होती. पण केंद्र संवेदनशिल होती. एटापल्ली तालुक्यातही यावेळी मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे दिसून येते.
(बॉक्स)दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची अंतिम टक्केवारी
तालुका - ग्रामपंचायती - मतदान
चामोर्शी - ६५ ग्रामपंचायती- ८२.२३ टक्के
मुलचेरा - १४ ग्रामपंचायती - ८०.४१ टक्के
अहेरी - २८ ग्रामपंचायती – ७३.७५ टक्के
एटापल्ली - १४ ग्रामपंचायती – ६४.९५ टक्के
भामरागड - २ ग्रामपंचायती – ५३.७९ टक्के
सिरोंचा - २७ ग्रामपंचायती – ८०.४८ टक्के
...या ठिकाणी होणार मतमोजणी
कोरची - तहसील कार्यालय सभागृह, कुरखेडा- तहसील कार्यालय, देसाईगंज- तहसील कार्यालय इमारतीच्या आतील परिसर, आरमोरी- नवीन प्रशासकीय भवन, खोली क्र. २१०, गडचिरोली- क्रीडा प्रबोधिनी, पोटेगाव रोड, धानोरा- महसूल मंडलाच्या आतील पटांगण, चामोर्शी- केवळरामजी हरडे महाविद्यालय, मूल रोड, मुलचेरा- तहसील कार्यालय येथील सभागृह, अहेरी- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागेपल्ली, एटापल्ली- महसूल मंडलाच्या आतील परिसर, भामरागड- तहसील कार्यालय, नाझर कक्ष, सिरोंचा- महसूल मंडलाच्या खुल्या आवारात व सभागृहात.