काेराेना लस देण्यासाठी जिल्हाभरातील ९ हजार ९६६ आराेग्य कर्मचाऱ्यांची नाेंदणी करण्यात आली आहे. नाेंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना १६ जानेवारीपासून लस देण्यास सुरुवात झाली. लस घेतलेल्या व्यक्तीला साैम्य ताप येणे, अंग दुखणे हा या लसीचा स्वभावगुण आहे. काही कर्मचाऱ्यांना तर हीसुद्धा लक्षणे जाणवत नाहीत. तरीही थाेडीफार भीती कर्मचाऱ्यांमध्ये कायम हाेती. त्यामुळे लस घेण्याचा क्रमांक असूनही काही कर्मचारी लस घेण्यास येत नव्हते. त्यामुळे ठरविलेल्या उद्दिष्टाएवढ्या लसी देणे शक्य हाेत नव्हते. मात्र, काही दिवसांनंतर लसीविषयीची भीती कमी हाेण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता ज्यांचा क्रमांक आहे असे कर्मचारी लस घेण्यास तयार हाेत आहेत. परिणामी लस घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
बाॅक्स
१५६८ जणांना मिळाली लस
गडचिराेली, आरमाेरी, चामाेर्शी, अहेरी या चार रुग्णालयांमध्ये काेराेनाची लस दिली जात आहे. शनिवारपर्यंत १ हजार ५६८ आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. पहिल्या दिवशी २१७ आराेग्य कर्मचारी, दुसऱ्या दिवशी १८७, तिसऱ्या दिवशी १८०, चवथ्या दिवशी ४३९ व पाचव्या दिवशी ५४५ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. दरदिवशी ४०० कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हेे उद्दिष्ट आता पूर्ण हाेत असल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स
क्रमांकातून सुटका
काेराेना लस काेणाला द्यावी, याबाबत प्राप्त झालेल्या सुरुवातीच्या सूचनांनुसार नाेंदणी झालेल्या ज्या कर्मचाऱ्याचा क्रमांक आहे, त्यालाच लस दिली जात हाेती. सुरुवातीच्या कालावधीत काेराेना लसीची असलेली भीती तसेच काही तांत्रिक कारणांमुळे कर्मचारी लस घेण्यास उपस्थित राहू शकत नव्हते, त्यामुळे लस देण्याची संख्या कमी हाेत हाेती. आता मात्र नाेंदणीकृत काेणताही कर्मचारी लस घेऊ शकणार आहे. आपल्या साेयीनुसार लस मिळणार असल्याने लस घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
बाॅक्स
लसीकरण झालेल्या व्यक्तीवर वाॅच
लसीकरण झालेल्या व्यक्तीला आराेग्य विभागामार्फत संदेश पाठवून लसीकरण झाल्यानंतर काेणती काळजी घ्यावी, याबाबत सूचना दिल्या जातात. तसेच लसीकरण झालेल्या व्यक्तीच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आराेग्याबाबतची विचारपूस केली जाते.