बाॅक्स
ग्रामीण भागातील नागरिकांचाही प्रतिसाद
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक काेराेना प्रतिबंधात्मक लस घेण्यास तयार हाेत नव्हते. आपल्या गावापर्यंत काेराेना पाेहाेचणार नाही, असा अंदाज हे नागरिक व्यक्त करीत हाेते. आता मात्र ग्रामीण भागातही काेराेनाचे रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे लस घेतलेले बरे, असा विचार करून नागरिक लसीकरणासाठी पुढे येत आहेत. प्राथमिक आराेग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू झाल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांसाठी साेयीचे झाले आहे.
काही जिल्ह्यांमध्ये काेराेना प्रतिबंधात्मक लस संपल्याने लसीकरण बंद करण्यात आले हाेते. आपल्याही जिल्ह्यातील लस संपू शकतात, असा अंदाज काही नागरिकांनी बांधला. साठा संपल्यास लस मिळणार नाही, अशी शंका उपस्थित झाल्याने नागरिक लसीकरणासाठी पुढे येत आहेत. जिल्ह्यात पुन्हा पाच दिवस पुरेल, एवढा लसीचा साठा उपलब्ध आहे.
काेट
प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावर लस उपलब्ध झाली आहे. गावाजवळ जवळच केंद्र असल्याने लस घेतली. इतरही ज्येष्ठ नागरिकांनी लस घ्यावी. लस घेतल्यानंतरही स्वत:ला गर्दीपासून दूर ठेवणे गरजेचे आहे.
- नरेंद्र देवगडे, ज्येष्ठ नागरिक.
२७ मार्च - ३१०
२८ मार्च - ०
२९ मार्च - ०
३० मार्च - ३२६
३१ मार्च - २१७४
१ एप्रिल - २६४१
२ एप्रिल - ४९७
३ एप्रिल - १११५
४ एप्रिल - १८७
५ एप्रिल - २५७३
६ एप्रिल - १०३०
७ एप्रिल - ३५९६