विज्ञान प्रदर्शनी व थाळीफेकमध्ये अव्वल अहेरी : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या तसेच गोळाफेक व थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल इंदाराम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या विद्यार्थिनी प्रगती चापले, ललिता मडावी व माधुरी चापले यांचा जागतिक महिला दिनी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्याहस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू दऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद गडचिरोलीच्या सभागृहात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. पदवाड, एस. पी. सूर, अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, सहाय्यक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रमोद खंडाते, माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम, उपशिक्षणाधिकारी राऊत, जिल्हा समन्वयक चौधरी, इंदाराम शाळेचे मुख्याध्यापक डी. वाय. ढवस आदी मान्यवर उपस्थित होते. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मार्गदर्शक शिक्षिका एच. डी. उराडे, पी. एन. बेठेकर तसेच विद्यार्थिनींनी तयार केलेल्या हस्तलिखित स्पंदन या अंकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)े
बालिका विद्यालयाच्या विद्यार्थिनींचा सत्कार
By admin | Published: March 11, 2017 1:41 AM