प्रशिक्षणार्थ्यांना यश : पोलीस विभागाचा उपक्रम लोकमत न्यूज नेटवर्क घोट : स्थानिक पोलीस मदत केंद्राच्या वतीने घोट येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण युवक, युवतींना देण्यात आले. या प्रशिक्षणातील दोन प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पोलीस भरतीत शिपाई पदावर निवड झाली. निवड झालेल्या उर्मिला गाथे रा. शांतीनगर व घोट येथील संदीप गाडीवार या दोन प्रशिक्षणार्थ्यांचा घोटचे प्रभारी पोलीस अधिकारी सुरेश जायभाये यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अनेकदा योग्य माहिती न मिळणे व प्रशिक्षणाअभावी दुर्गम व भागातील युवकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पोलीस भरतीचा मार्ग सुकर व्हावा, या उद्देशाने घोट पोलीस मदत केंद्राच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्तरावर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेण्यात येत आहे.
पोलीस भरतीत निवड झालेल्या दोघांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2017 1:23 AM