लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : येथील जि. प. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी संघाने तालुका, जिल्हा व विभागस्तरावर यश मिळवून राज्यस्तरावर धडक दिली. त्यांच्या या यशाबद्दल जि. प. हायस्कूलमध्ये मंगळवारी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ई. एच. टेकाम होते. प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार विलास सुपे, पीएसआय प्रताप पाटील, पत्रकार नागभूषणम चकीनारपूवार, शाळा समिती अध्यक्ष उत्तम रादंडी, भगवान मडावी, गायकवाड उपस्थित होते.राज्यस्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींनी राज्यस्तरावर भरघोष मिळवावे. राज्यस्तरावर पोहोचण्याचा दुसºयांदा मान मिळाला आहे, असे प्रतिपादन टेकाम यांनी केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. संघात प्रवीणा ठाकूर, महेश्वरी दोर्ला, रवली गुरनुले, करिश्मा सय्यद, तजलिका सय्यद, रवीना दयाला, सविता ठाकूर, रोजा युल्लादुला, शिवानी गुरनुले, श्रावणी जागरी, सपना येलपुला, वैैष्णवी अरेला आदींचा समावेश आहे. मुंबई येथे होणाºया राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमादरम्यान पीएसआय प्रताप पाटील यांनी मार्गदर्शन केले. संचालन जांभोरे, प्रास्ताविक सोनेकर तर आभार येसेकर यांनी मानले.
राज्यस्तरावर निवड झालेल्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 11:42 PM
येथील जि. प. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी संघाने तालुका, जिल्हा व विभागस्तरावर यश मिळवून राज्यस्तरावर धडक दिली.
ठळक मुद्देसिरोंचात कार्यक्रम : जि. प. हायस्कूलच्या विद्यार्थिनी