ऑनलाईन लोकमतगडचिरोली : बाह्मणी व भगवानपूर येथील महिलांनी पाच दारू विक्रेत्यांकडून ८० लिटर मोहाची दारू, लाखभर किंमतीचा मोहसडवा नष्ट करत गावातील अवैध दारूविक्री करणाऱ्या विक्रेत्यांना अद्दल घडवली. गडचिरोली पोलीस विभागाने महिलांनी केलेल्या तक्रारीवर त्वरित कृती करून शेतांमध्ये लपवलेला २ क्विंटल मोहाचा सडवा जप्त केला व ५ दारू विक्रेत्यांवर कारवाई केली.मोहडोंगरी आणि भगवानपूर गावात वाहत असलेल्या दारूच्या पुराचा त्रास बाम्हणी व भगवानपूरच्या महिलांना सहन करावा लागत होता.गावात कधी शिवीगाळ, तर कधी तंटे होत होते. आता हे सहन करायचे नाही, हे गावातील महिलांनी पक्के ठरवून अवैध दारूविक्रीची ठिकाणे बंद करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांना गावातील युवकांनीही साथ दिली.१९ तारखेला गावातील संघटना सदस्यांची मुक्तिपथ चमूने एक कार्यशाळा घेतली व त्यात गावातील महिला संघटनेने दारू विक्री बंदीसाठी काय कृती करायची हे ठरवले. त्यानुसार रॅली काढून सर्व दारू विके्रत्यांना दारू विक्री बंद करण्यासाठी नोटीस देण्यात आली. नंतर गाव संघटना सदस्यांनी पोलीस तक्रार देऊन २३ फेब्रुवारीला पोलिसांच्या मदतीने दारू पकडून दारूचे साहित्य नष्ट केले.पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड व त्यांच्या टीमने सदर कारवाई केली. मुक्तिपथ गडचिरोली तालुका प्रेरक रेवनाथ मेश्राम, तालुका संघटक कीर्ती कांबळे व तालुका उपसंघटक मनोज पिसुड्डे यांनी या प्रक्रियेत महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी बाम्हणी येथील तंटामुक्ती अध्यक्ष माणिक लाडे, वर्षा म्हशाखेत्री, मेघराज कोकोडे, मेघा साहरे, मनीषा कोकोडे, वैशाली कुमरे, शीतल गेडाम, संगीता मोहुर्ले, नूतन मोहुर्ले, वीणा कुमरे, सुलोचना कोकोडे, सिंधू सहारे उपस्थित होते.
महिलांची मोहफूल हातभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:45 PM
बाह्मणी व भगवानपूर येथील महिलांनी पाच दारू विक्रेत्यांकडून ८० लिटर मोहाची दारू, लाखभर किंमतीचा मोहसडवा नष्ट करत गावातील अवैध दारूविक्री करणाऱ्या विक्रेत्यांना अद्दल घडवली.
ठळक मुद्देबाह्मणी व भगवानपूर येथील महिलांनी गावातील अवैध दारूविक्री करणाऱ्या विक्रेत्यांना अद्दल घडवली.