जिल्ह्यात माडिया भाषेत शिक्षणाची सोय करा
गडचिरोली : दुर्गम भागात माडिया भाषा बोलणाºयांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र शिक्षक व शाळा हा प्रवाह काही दिवसांपूर्वी पुढे आला होता. मात्र त्या शाळा सुरू झाल्या नाहीत. हिंदी व बंगाली प्रमाणे माडीया भाषेतून शिक्षणाची सोय करण्याची मागणी आहे.
मुद्रांक विक्रीत नागरिकांची लूट
गडचिरोली : विविध कामासाठी लागणाºया मुद्रांकाची विक्री शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने सुरू आहे. १०० रूपये किमतीचे मुद्रांक ११०, ५०० रूपयांचे मुद्रांक ५१० रूपयाने विकल्या जात आहे.
डिजिटल बॅनरमुळे पेंटिंग व्यवसायावर परिणाम
सिरोंचा : संगणकाद्वारे विविध मल्टी कलरचे आकर्षक बॅनर मशीनद्वारे बनविण्यात येतात. ते कमी किंमतीत कमी वेळात उपलब्ध होतात. त्यामुळे विविध रंगाचे डब्बे व ब्रश घेऊन दिसणारे पेंटर आता दिसेनासे झाले आहेत.
तंटामुक्त समित्यांमधील अंतर्गत वादात वाढ
देसाईगंज : तंटामुक्त समित्यांचे पदाधिकारी गावातील भांडण सोडविण्याऐवजी विविध मुद्द्यांवर स्वत:च भांडण करीत असल्याने गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. परिणाम तंमुसच्या कामावरही झाला आहे.
येवली येथे जलद बसचा थांबा द्या
गडचिरोली : येथून जवळच असलेल्या येवली येथे जलद बस थांबा आहे. मात्र गडचिरोली आगाराच्या बसगाडया व्यतिरिक्त इतर आगाराच्या जलद बसगाडया येथे थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांना गडचिरोली आगारात बसगाडी बदलवावी लागत आहे. त्यामुळे येथे जलद बसथांबा देण्याची मागणी होत आहे.
लोंबकळणाºया तारांमुळे वाढला धोका
धानोरा : शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच इतरही वॉर्डांमध्ये विजेच्या तारा लोंबकळत आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी वीज विभागाकडे तक्रारही केली आहे. मात्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष आहे.
कलेक्टर कॉलनीत सांडपाण्याची दुर्गंधी
गडचिरोली : शासकीय कर्मचाºयांची वसाहत समजल्या जाणाºया कॉम्प्लेक्स परिसरातील कलेक्टर कॉलनीतील ड्रेनेज लाईन फुटली आहे. त्यामुळे सांडपाण्याची दुर्गंधी येत आहे.
वन विभागावर वाढला रिक्त पदांचा भार
गडचिरोली : जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात २ हजार पेक्षा अधिक वनकर्मचाºयांची पदे मंजूर आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाºयांवर कामाचा भार वाढत चालला असून लाकूड तस्करी थांबविणे अशक्य झाले आहे.
बालमजुरी कायद्याची अवहेलना सुरूच
कुरखेडा : जिल्ह्याच्या शहरी भागात हॉटेल, गॅरेज, चहा टपºया व इतर दुकानांमध्ये अल्पवयीन मुले काम करीत आहेत. परिणामी बाल मजुरी कायद्याची खुलेआम अवहेलना होत आहे. १६ वर्षाखालील बालकांना तुटपुंजी मजुरी देऊन त्यांची पिळवणूक केली जात आहे. मात्र याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे.
सट्टापट्टीसाठी इंटरनेटचा वापर वाढला
कुरखेडा : तालुक्यासह जिल्हाभरातील शहरी भागात सट्टापट्टीचे नंबर पाहण्यासाठी मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. अनेक लोक भ्रमणध्वनीवर इंटरनेटद्वारे सट्टापट्टीचे नंबर शोधताना दिसून येतात. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
गोगाव-पिपरटोला मार्गाची दुरूस्ती करा
गडचिरोली : तालुक्यातील गोगाव-पिपरटोला या मार्गाची अनेक दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
आलापल्ली येथे गतिरोधक निर्माण करा
आलापल्ली : येथील नागमाता मंदिरात भाविकांची गर्दी दर्शनासाठी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु या मार्गाने भरधाव वाहनांचे आवागमन असते. येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांचेही आवागमन असते.
पशुखाद्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ
आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाºया जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारल्या जाते. यामुळे जनावर सुदृढ राहून दुध जास्त देते. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यांनाही बसला आहे. पशुखाद्यांच्या किमती जवळपास १० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच
आलापल्ली : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गुटखा विक्री सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड, आंध्रप्रदेश या राज्यातून अवैध गुटखा विक्रीस आणल्या जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आलापल्ली येथे बंधाºयाचे बांधकाम करा
आलापल्ली : परिसरातील गावांमध्ये कोल्हापुरी बंधाºयाचे बांधकाम करावे, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. गावात अल्प हातपंप सुरू असल्याने येथे नव्याने हातपंपही निर्माण करावे, अशी मागणी आहे.
पोर्ला बसस्थानकावर गतिरोधक उभारा
गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे.
खुटगाव येथील प्रवासी निवाºयाची दुरवस्था
धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाºयाच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाºयाचे अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सदर प्रवासी निवाºयाची दुरूस्ती करावी.
राजपूर व बोरीतील डुकरांचा बंदोबस्त करा
अहेरी : राजपूर पॅच व बोरी परिसरात मोकाट डुकरांचा प्रकोप वाढला आहे. या भागातील नागरिक डुकरांच्या हैदोसामुळे त्रस्त झाले असल्याने त्यांचा बंदोबस्त त्वरित करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शेत जमिनी होत आहेत अकृषक
एटापल्ली : शेतजमिनी अकृषक करून तेथे प्लॉट पाडण्यात येत आहे. त्यामुळे जमिनीचे भाव वाढले आहे. शहरातील काही ठरावीक मंडळी जमिन खरेदी करण्यासाठी शेत मालकावर दबाव टाकत आहे. चांगल्या जमिनी व्यावसायिकांच्या घशात जात आहे.
पोलीस पाटलांचे मानधन वेळेवर देण्याची मागणी
आरमोरी : पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया गावातील अनेक पोलीस पाटलांचे मानधन वेळेवर होत नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष द्यावे.