शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

महिलांचा कोंडमारा दूर करणारा सण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:38 PM

संक्रांतीच्या निमित्ताने गृहिणींना घराबाहेर पडण्याची संधी मिळते. एरवी वर्षभर संसारात गुरफटून राहणाऱ्या महिलांना त्यांचे विचार प्रकट करता येतात. यातून अनेक महिलांचा घरात होणारा कोंडमारा दूर होतो. महिला संक्रांतीचे वाण देतात आणि घेतात.

ठळक मुद्दे‘दे वाण-घे वाण’ झालीच पाहिजे

संक्रांतीच्या निमित्ताने गृहिणींना घराबाहेर पडण्याची संधी मिळते. एरवी वर्षभर संसारात गुरफटून राहणाऱ्या महिलांना त्यांचे विचार प्रकट करता येतात. यातून अनेक महिलांचा घरात होणारा कोंडमारा दूर होतो. महिला संक्रांतीचे वाण देतात आणि घेतात. हे केवळ एक धार्मिक परंपरा म्हणूनच नाही तर या दे वाण, घे वाण मधून तयार होणारा जिव्हाळा, आपुलकी माणसाच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवून आणतात, आणि हेच या सणाचे यश आहे.संक्रातीच्या निमित्ताने महिला भेटतात, त्यांचे मन मोकळे करतात, विचारांची देवाणघेवाण होते, त्यामुळे महिलांचे मन हलके होण्यासोबतच त्यांच्यावरील ताणतणाव कमी होण्यास मदत होते.महिलांच्या प्रगतीच्या वाटा अधिक सशक्त करणाऱ्या या सणाचा आपण सन्मान केला पाहीजे. आजकाल बहुतांश महिला नोकरी करतात. नोकरी, संसार सांभाळताना त्यांना स्वत:साठी वेळ देणे शक्य होत नाही. त्यातून त्यांचे सुख-दु:ख एकमेकींना कळत नाही. शेजारी राहूनही अनेक महिलांमध्ये दुरावाच असतो. पण संक्रांतीच्या सणानिमित्ताने महिलांच्या गाठीभेटी होतात. आरोग्यासाठी तीळ चांगले आहेत. त्याने रक्ताचे प्रमाण वाढते. शरीराला उष्णता मिळते. हाडाचे दुखणे दूर होते. घरात आरोग्यवर्धक वातावरण राहते. त्यामुळेच तीळगुळासह संक्रांतीच्या सणातील आनंद प्रत्येक घरात साजरा झाला पाहीजे.