गडचिराेली : गाेवर हा मुख्यत: लहान मुलांमध्ये आढणारा सांसर्गिक विषाणूजन्य आजार आहे. यात सुरुवातीला सर्दी, खाेकला, ताप आणि नंतर अंगावर पुरळ येतात. निराेगी व सुदृढ मुलांना याचा फारसा त्रास हाेत नाही. मात्र कुपाेषित व कमी वजनांच्या बालकांमध्ये गाेवरचे विविध दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसताच वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.
पूर्वी गाेवर साधारणपणे दाेन ते तीन वर्षांनी साथीच्या स्वरूपात येत असे. आराेग्य यंत्रणेचे नियाेजन व व्यापक लसीकरणामुळे आता गाेवरचे प्रमाण कमी झाले आहे. गाेवर मुलाच्या पहिल्या दाेन ते तीन वर्ष वयातच येऊन जाताे. पण ताे कधीकधी उशिराही येऊ शकताेे. गाेवर एकदा हाेऊन गेला की, आयुष्यभर गाेवरविरुद्ध टिकणारी प्रतिकारशक्ती देऊन जाताे. त्यामुळे परत गाेवर हाेत नाही.
बाॅक्स...
असे केले जाते निदान
-कुठल्याही वयाेगटातील व्यक्तीला ताप व पुरळ आल्यापासून २८ दिवसांच्या आत गाेवर, रुबेलाची तपासणी करणे आवश्यक आहे.
-पुरळ आल्यापासून सात दिवसांच्या आत रुग्णाचे रक्तजल नमुने तसेच घश्याचा स्वॅब किंवा लघवीचे नमुने तपासले जातात. आराेग्य विभागामार्फत प्रयाेगशाळेत तपासणी करून निदान केले जाते.
-गाेवरमध्ये डाेळे लाल हाेणे, सर्दी, बारीक ताप, खाेकला आदी त्रास जाणवताे. लालसर ठिपके गालाच्या अंतर्भागावर दिसून येतात.
बाॅक्स...
१०० गाेवर-रुबेलाचे टक्के लसीकरण
- गडचिराेली जिल्ह्यात सन २०१८ मध्ये गाेवर, रुबेलापासून बालकांचे संरक्षण करण्याच्या हेतूने जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाडी केंद्रांमधून गाेवर व रुबेला लसीकरण राबविण्यात आली. या माेहिमेत ९ महिने ते १५ वर्षे वयाेगटातील बालकांना लस देण्यात आली.
- गडचिराेलीसह तालुकास्तरावरील तसेच सर्व शासकीय रुग्णालयात गाेवर व रुबेलाची लस बालकांना दिली जाते. याची नाेंद रितसर आराेग्य कार्डावर केली जाते.
बाॅक्स...
...तर डाॅक्टरांना दाखवा
- पुरळ ज्या क्रमाने येते, त्याच क्रमाने वरून खाली नाहीसे हाेतात. काही दिवस पुरळच्या जागी खुणा राहतात. वाढत जाणारा ताप, पुरळ उठायचे थांबल्यानंतर ताे क्षमताे. ताेंडातील पुरळामुळे काही खाता येत नाही. भूक मंदावते. सर्वसाधारपणे पुरळ निघाल्यापासून सात दिवसांत मूल बरे हाेते. न झाल्यास डाॅक्टरांना दाखविणे याेग्य ठरते.
काेट...
सद्य:स्थितीत सर्वत्र व्हायरल फिवरची साथ सुरू आहे. यातील काही रुग्णांना डेंग्यू, मलेरियाची लक्षणे दिसून येत आहेत. रुग्णाला तापासाेबत पुरळ असल्यास ते गाेवर, रुबेलाची लक्षणे असू शकतात. ही लक्षणे कुठल्याही वयाेगटातील रुग्णामध्ये दिसू शकतात. त्यामुळे नागरिकांनी वेळीच आराेग्य यंत्रणेशी संपर्क साधावा.
- डाॅ.समीर बन्साेडे, जिल्हा माता व बाल संगाेपन अधिकारी