कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे होणाऱ्या जीवितहानीमुळे एक सकारात्मक संदेश लोकांपर्यंत जावा. या हेतूने आरमोरी येथील गणेश बैरवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोनावर आधारित एक शॉर्ट फ़िल्म तयार केली आहे. या लघुपटात काम करणारी कलाकार मंडळी ही आरमोरी येथीलच आहेत. लघुपटाच्या माध्यमातून कोरोनाविषयी जनजागृती करण्याचा छोटासा प्रयत्न त्यांनी केला आहे. ‘फाइट फॉर लाइफ’ या लघुपटाच्या कथानकात कोरोना महामारीच्या आधी आपण सगळे एकत्र येऊन, मिळून मिसळून लोकांच्या सुखदुःखात कसे सहभागी होत राहतात. अगदी हजारोंच्या संख्येने सर्व सण, उत्सव अगदी गुण्यागोविंदाने साजरे करायचे. मात्र, एका कोरोना विषाणूने आपल्या जीवनात खूप मोठा आमूलाग्र बदल घडवून आणला. आज माणसाला माणसापासून दूर राहण्यासाठी धडपड करावी लागत आहे. आपल्या जीवनाची दशा आणि दिशा या कोरोनाने बदलवून टाकली आहे.
या लघुपटातील आई ही स्वतः पुढाकार घेऊन समाजात निर्माण झालेली भीती व प्रशासनावरील ताण पाहून आपल्या मुलांना प्रोत्साहित करते. काेरोनाच्या या प्रकोपामध्ये आपलेही समाजाप्रती व शासन प्रशासनाप्रती कर्तव्य आहेत. आपणही प्रशासनावर अवलंबून न राहता, प्रशासनाच्या मदतीला जावे. मात्र, मदतीला जाताना आपणही आपली काळजी व पुरेशी सुरक्षा घेऊनच समाजाला व प्रशासनाला जे जे सहकार्य व मदत करता येईल, ते ते करावे, अशा प्रकारे लघुपटातील आई आपल्या मुलांना प्रोत्साहित करते. त्याचप्रमाणे, लघुपटातील मुले आपले लहान-लहान ग्रुप तयार करून लोकांना कोरोनाविषयी जागृत करतात.
तीन महिन्यांचा लागला कालावधी
सदर लघुपट बनवायला तीन महिन्यांचा कालावधी लागला. गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात अशा प्रकारच्या लघुपटाची निर्मिती करणे हे एक आवाहनच होते, परंतु काहीतरी करण्याची जिद्द, परिश्रम, आवड, व समाजाप्रती असलेली बांधिलकी याच्या जोरावर हा लघुपट पूर्णत्वास आला. या लघुपटाचे लेखक, दिग्दर्शक व निर्माते गणेश बैरवार हे आहेत, तर लघुपटाचे छायाचित्रण बाळू मने यांनी केले आहे. लघुपटात नवोदित कलावंत प्रफुल्ल ठवकर, वैष्णवी गांगवे, हितैशी दिवटे, सविता दरेकर, गौरी खरवडे, श्वेता ठवकर, सेजल भरणे, ऐश्वर्या मारोडकर, प्राजक्ता इंकने, वेदांत समर्थ, अर्चना जाधव, रोहित महल्ले, शोएब लालानी, साई खरवडे, अबरार भुरा व इतर कलावंतांनी भूमिका साकारल्या आहेत.
===Photopath===
260421\26gad_2_26042021_30.jpg
===Caption===
फाईट फाॅर लाईफ लघुपटाचे पाेस्टर