आलापल्लीच्या मेळाव्यात निर्धार : अहेरी उपविभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थितीआलापल्ली : महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेने पेंशन मिळविण्यासाठी प्रकरण न्यायप्रविष्ट केले आहे. त्यामुळे आता न्यायालयाचा लढा लढून आपला हक्क आपण मिळविणार आहो, असा निर्धार अहेरी उपविभागातील सर्व तालुक्यातील महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी मेळाव्यात जाहीर केला. या मेळाव्यात जुनी पेंशनचे महत्त्व, फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यादरम्यान मार्गदर्शन करताना प्रदीप रामगिरवार यांनी नवीन पेंशनचे कोणते तोटे आहेत, त्यामुळे किती कुटुंब उघड्यावर आले आहेत, याबाबत माहिती दिली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवघडे यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. लवकरच न्याय मिळण्याची आशाही व्यक्त केली. वन विभागाची सर्व जबाबदारी व कार्य मनीष कावडे यांनी उचलली. योगेश शेरेकर यांच्यावर जिल्हा नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना योगेश शेरेकर यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वत:चे कर्तव्य माणून लढा दिला पहिजे, आवश्यक त्यावेळी संघटनेला सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन केले. दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील सर्व कर्मचारी एकत्र आणण्यासाठी सदर मेळावा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे अहेरी तालुकाध्यक्ष राजू सोनटक्के यांनी मत व्यक्त केले. मेळाव्याला मुलचेरा तालुका कार्यकारिणीचे जाधव, एटापल्ली तालुक्यातून वेलादी, कुमरे, केंद्रे, मैलारे, खाटेकर, पाटील, सिरोंचा तालुक्यातून गऱ्हाटे, मुंडे, तगडे, चामोर्शी तालुक्यातून पुंगाटी, भिसे, पालवे, रमेश रामटेके, नितीन कुमरे, श्रीकांत येनगंटीवार, पोटे, अलोणे, पवार, तांदळे उपस्थित होते. ज्योती आत्राम, योगीता नैताम, सरस्वती अर्का, भारती बट्टे, नारायण नागरे, पठाण, रहांगडाले, राठोड, निमसरकार, खोब्रागडे, रामटेके उपस्थित होते.
पेंशनसाठी न्यायालयीन लढाई लढणार
By admin | Published: October 05, 2016 2:23 AM