चोप गावात जमीन शंकर पटासाठी राखीव ठेवण्यात आली होती. या जागेवर शंकरपट भरत होते; परंतु शासनाने बैलांच्या शर्यतीवर निर्बंध आणल्याने शंकरपट बंद झाले. तेव्हापासून ही जागा पडीक होती. या जमिनीवर राजू मनीराम चहांदे यांनी १४ ऑगस्ट २०१९ राेजी ट्रॅक्टरने नांगरणी करून अतिक्रमण केले. पोलीस प्रशासन, वन विभाग, महसूल विभाग व ग्राम प्रशासन यांच्या उपस्थितीत १९ मे २०२० रोजी राजू मनीराम चहांदे यांनी केलेले अतिक्रमण हटवण्यात आले होते. या जागेवर अतिक्रमण करू नये, असा निकाल उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांनी दिला हाेता; मात्र त्यानंतरही चहांदे हे अतिक्रमण साेडण्यास तयार नव्हते. वेळाेवेळी नाेटीस बजाविल्यानंतरही अतिक्रमण काढले जात नसल्याने ग्रामपंचायतींनी याबाबतची तक्रार देसाईगंज पाेलीस स्टेशनमध्ये दाखल केली. त्यानुसार चहांदे यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतिक्रमण केल्याने गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:45 AM