शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

लगामच्या ३३ केव्ही उपकेंद्रासाठी दिलेल्या जमिनीचे १४ लाख भरा

By admin | Published: September 23, 2016 1:37 AM

तालुक्यातील लगाम येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रासाठी मंजूर केलेल्या जमिनीचे भोगाधिकार

लेखापरीक्षणात आक्षेप : तहसीलदारांचे महावितरण कंपनीला पत्रमुलचेरा : तालुक्यातील लगाम येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रासाठी मंजूर केलेल्या जमिनीचे भोगाधिकार मुल्य कमी आकारल्याचा महालेखापाल यांनी लेखा परिक्षणादरम्यान ठपका ठेवल्याने १४ लाख ३८ हजार २०० रूपये एवढी रक्कम सरकार जमा करण्याचे पत्र वीज वितरण कंपनीला दिले आहे.लगाम येथे ३३ केव्ही उपकेंद्र मागील अनेक वर्षांपासून मंजूर होते. तथापी जागेअभावी त्याचे बांधकाम रखडले होते. मात्र जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी ७ मार्च २०१५ ला लगामचेक येथील कांचनपूर मार्गावरील सर्वे नंबर १२७ व १२८ मधील जागा उपलब्ध करून दिली. त्या मोबदल्यात वीज वितरण कंपनीने केवळ ६६ हजार रूपये सरकारजमा केले होते. नागपूरचे लेखापाल यांनी ४ ते ११ जुलै २०१६ पर्यंत महसूल जागेचे निरिक्षण करून लगामच्या ३३ केव्ही उपकेंद्रास दिलेल्या जमिनीचा भोगाधिकार मुल्य कमी वसूल केल्याचा ठपका ठेवून १४ लाख ३८ हजार २०० रूपये तत्काळ सरकारजमा करण्याचे पत्र बल्लारपूरच्या कार्यकारी अभियंता (वीज वितरण कंपनी) यांना तहसीलदारामार्फत पाठविले आहे. (तालुका प्रतिनिधी)