शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

रुग्णालयांमधील रिक्त पदे भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 10:46 PM

जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत.

ठळक मुद्देजिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन : सीटी स्कॅनचा खर्च देण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. सदर पदे भरण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली असून याबाबतचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांना देण्यात आले.जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये वर्ग ३ ची १६९ पदे, वर्ग ४ ची १०७ पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर वर्ग १ च्या डॉक्टरचे ३० पदे मंजूर असून केवळ ९ पदे भरण्यात आली आहेत. सुमारे २१ पदे रिक्त आहेत. महिला व बाल रुग्णालयात १७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक पद भरण्यात आली असून सुमारे ४४ पदे रिक्त आहेत. डॉक्टर व कर्मचाºयांच्या रिक्तपदांमुळे आरोग्यसेवा मिळण्यास अडचण जात आहे. ही बाब जिल्हा शल्य चिकित्सकांच्या लक्षात आणून दिली. एक महिन्याअगोदर सिजरिनचे आॅपरेशन करण्यात आले. मात्र टाके व्यवस्थित बांधण्यात आले नाही. त्यामुळे सदर महिलेवर दुसºयांदा टाके मारावे लागले. काही रुग्णांवर एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटूनही उपचार केले जात नाही. अतिरिक्त भारामुळे कामाचा बोजा वाढला आहे. परिणामी रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णालयातील सीटीस्कॅन बंद असल्याने खासगी रुग्णालयात सीटीस्कॅनसाठी पाठविली जात आहे. सीटीस्कॅनचा खर्च रुग्णालयाने उचलावा, अशी मागणी केली. रुग्णसेवा सुरळीत न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.निवेदन देतेवेळी माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, नगरसेवक सतीश विधाते, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महासचिव प्रभाकर वासेकर, तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, पांडुरंग घोटेकर, जिल्हा सचिव पी.टी. मसराम, एजाज शेख, देवाजी सोनटक्के, बाळू मडावी, कमलेश खोब्रागडे, कुणाल पेंदोरकर, लहुकुमार रामटेके, रामचंद्र गोटा, जितू मुनघाटे, राकेश रत्नावार, प्रतीक बारसिंगे, पंडित पुडके, प्रकाश अंबाडकर उपस्थित होते.