शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
12
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
13
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
14
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
15
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
16
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
17
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

अखेर आरमोरी झाली नगर परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:26 AM

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी नगर पंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्याची अधिसूचना राज्य शासनाने १२ सप्टेंबर २०१७ रोजी जारी केली. त्यामुळे आरमोरीकरांची नगर परिषदेची प्रतीक्षाही संपली असून यासाठी सुरू असलेल्या लढ्याला मोठे यश आले आहे.गेल्या दोन वर्षांपासून आरमोरीवासीयांनी नगर परिषदेची मागणी केली होती. विशेषत: सहकार व भाजप नेते अरविंद सावकार ...

ठळक मुद्देशासनाकडून अधिसूचना जारी : जिल्ह्यातील तिसरी नगर पालिका होणार, आरमोरीकरांत आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी नगर पंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्याची अधिसूचना राज्य शासनाने १२ सप्टेंबर २०१७ रोजी जारी केली. त्यामुळे आरमोरीकरांची नगर परिषदेची प्रतीक्षाही संपली असून यासाठी सुरू असलेल्या लढ्याला मोठे यश आले आहे.गेल्या दोन वर्षांपासून आरमोरीवासीयांनी नगर परिषदेची मागणी केली होती. विशेषत: सहकार व भाजप नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याला प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांनीही बळ दिले. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे कार्यकर्त्याकरवी जनहित याचिकाही दाखल केली होती. ती निकाली काढताना न्यायालयाने चार आठवड्यात यावर राज्य सरकारने निर्णय द्यावा, असे निर्देश दिले होते. त्या निर्देशाचा आदर करीत राज्य शासनाने आरमोरीला अखेर नगर परिषदेचा दर्जा दिला.२०१५ मध्ये राज्य शासनाने तालुकास्तरावरील गावांना ग्रामीण क्षेत्रातून वगळून नागरी क्षेत्रात समाविष्ट केले व तालुकास्तरावरील ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा दिला. मात्र नगर पंचायतीवर आरमोरीकर नाराज होते. आरमोरी ग्रामपंचायतीला नगर पालिकेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत होती.यासंदर्भात माजी उपसरपंच दीपक निंबेकार, हैदरभाई पंजवानी, श्रीहरी कोपुलवार, जागोबा खेडकर, भाग्यवान दिवटे, महेश बांते आदींनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. अरविंद सावकार यांनी ताकद लावून सरकारदरबारीही आपले वजन वापरले. सोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे यांनीही प्रयत्नात भर पाडली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद पोरेड्डीवार यांच्या मागणीला अनुकूलता दाखवून नगर परिषदेच्या निर्णयाला हिरवी झेंडी दिल्यामुळे आरमोरीवासीयांसाठी गोड बातमी मिळणार अशी माहिती पंधरवड्यापूर्वीच त्यांनी दिली होती. १२ सप्टेंबर २०१७ रोजी आरमोरी नगर परिषदेच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता प्राप्त करून घेतली. त्यानंतर नगर परिषदेची अधिसूचना काढण्यात आली.न्यायालयीन लढाईत या प्रकरणाच्या ४० तारखा झाल्या. पण जिद्दीने ही लढाई लढल्याने यश पदरी पडल्याची भावना सावकारांनी व्यक्त केली. आरमोरी नगर परिषदेच्या निर्णयाने आरमोरीकर आनंदीत झाले असून या निर्णयाचे शहरवासीयांनी जोरदार स्वागत केले आहे.दोन ग्रामपंचायतींचा होणार समावेशआरमोरी नगर परिषदेत आरमोरी, शेगाव, अरसोडा, पालोरा आदी गावांचा समावेश राहणार असून दोन ग्रामपंचायती आरमोरी नगर परिषदेत समाविष्ट करण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शहराच्या लोकसंख्येत भर पडेल.पोरेड्डीवारांच्या पाठपुराव्याला यशआरमोरी नगर परिषद व्हावी, यासाठी नागरिकांच्या मागणीला घेऊन भाजपचे नेते अरविंद पोरेड्डीवार, प्रकाश पोरेड्डीवार यांनी राज्य शासनाकडे जोरदार पाठपुरावा केला. न्यायालयीन लढाईत सर्व अडथळे पार करीत मुख्यमंत्र्यांनाही निर्णय घेण्यास प्रवृत्त केले.शहरात विविध कामे होणारआरमोरी शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून काही दिवसांपूर्वी शहर विकासासाठी पाच कोटी रूपये देण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने हिरवी झेंडी दिली आहे. आरमोरी शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहो. केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे समाधान आहे.- कृष्णा गजबे,आमदार, आरमोरीआरमोरीच्या विकासाला गती मिळणारआरमोरी शहराचा मॉडेल विकास करण्यासाठी माझे नेहमीच सहकार्य असते, सर्वसामान्य नागरिकांना सोयीसुविधा देण्यासोबतच शहरातील पाणी समस्या, रस्ते, आरोग्य यासाठी आपण पाठपुरावा करण्यास तत्पर आहो, आता आरमोरी नगर परिषद झाल्याने विकास गतीने होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करतो.- अरविंद पोरेड्डीवार,सहकार तथा भाजप नेते, आरमोरी