चामोर्शी नगर पंचायतअंतर्गत शहरातील मुख्य मार्गावरील दोन्ही बाजूने नालीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, तसेच मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही बाजूंनी असलेले जुने ९ मीटर लांबीचे खांब काढून त्याजागी नवीन १२ मीटर लांबीचे विद्युत खांब गाडण्याबाबत, तसेच राष्ट्रीय महामार्ग व विद्युत वितरण कंपनी यांनी सादर केलेल्या इस्टिमेटवरून वाद निर्माण झाला हाेता. पावसाळा तोंडावर येत असताना काम रेंगाळले हाेते. ही बाब आमदार डॉ. देवराव होळी यांना माहीत हाेताच त्यांनी विद्युत वितरण कंपनी, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी आणि काम करणारी एजन्सी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे लावली. चर्चेतून नवीन मार्ग निघाला व वाद संपुष्टात आला आणि संबंधित एजन्सी आदींच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली व त्यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यानंतर लगेच चामोर्शी शहरात नवीन पोल गाडण्याच्या कामाला सुरुवात झाली. विद्युत खांब गाडून वायरिंगचे काम कंत्राटदार पवन बडघरे यांच्यामार्फत सध्या युद्धस्तरावर सुरू आहे.
===Photopath===
300521\img-20210530-wa0123.jpg
===Caption===
नवीन विद्युत पोल लावण्याचे काम जोमाने सुरू