लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी छत्तीसगड राज्याने कोरची-कोटगूल मार्गावर सीमांवर चेक पोस्ट बसवून नाकेबंदी केली. तसेच नागरिकांनी झाडे टाकून हा मार्ग बंद केला होता. मार्ग बंद झाल्याने परिसरातील नागरिकांची अडचण वाढली होती. याबाबत लोकमने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाला जागे केले होते. अखेर छत्तीसगड व महाराष्टÑ या दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सदर मार्गावरील झाडे जेसीबीच्या सहाय्याने हटवून हा मार्ग पूर्ववत सुरू करण्यात आला.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २५ मार्च ते १४ एप्रिल अशा एकूण २१ दिवसांपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. कोरची-कोटगूल हा ३० किमी अंतराचा मार्ग आहे. या मार्गावर ग्रामीण भागातील बहुतांश गावे येतात. सदर मार्गावर छत्तीसगड राज्यातील पाटण, बंजारी, भुरकुंडी आदी गावे पडतात. सदर गावातील नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने याचा प्रसार होऊ नये म्हणून रस्त्यावर झाडे टाकून २५ मार्चपासून रस्ता अडविला होता. परिणामी कोटगूल भागातील नागरिकांना अत्यावश्यक सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत होते.या संदर्भात लोकमतने ३ एप्रिलला ‘छत्तीसगडच्या सीमा बंदीचा कोरची तालुक्यातील गावांना फटका’ या मथड्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत छत्तीसगडच्या प्रशासनाला कळविले. राजनांदगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जयप्रकाश मोर्य यांच्या आदेशानुसार ५ एप्रिल रोजी रविवारला उपविभागीय अधिकारी सी. जी. बघेल, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश कांबळे, मोहलाचे तहसीलदार ठाकूर, चिल्हाटीचे पोलीस निरीक्षक नासीर भट्टी, कोरचीचे तहसीलदार सी. आर. भंडारी, नायब तहसीलदार बी. आर. नारनवरे, पुरवठा निरीक्षक नरेश सिडाम, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सद्दीन भामानी आदींनी प्रत्यक्ष रस्ता अडविलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. कापलेली झाडे रस्त्यावर टाकून रस्ता अडविण्यात आल्याचे दिसून आले.छत्तीसगड व महाराष्टÑ या दोन्ही राज्याच्या अधिकाºयांनी मिळून गावातील नागरिकांच्या सहकार्यातून जेसीबीच्या सहाय्याने या मार्गावर टाकलेले झाडे हटविण्यात आले. कोरची-कोटगूल मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. बंजारी, वासडी येथील नागरिकांनी झाडे सरकविण्यास मदत केली. सदर झाडे सरविण्यास एक तास लागला.१० दिवसानंतर मार्ग सुरूकोरची-कोटगूल मार्ग बंद असल्याने सीमांवरील गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता. झाडे टाकून मार्ग बंद केल्याने नागरिक त्रस्त झाले होते. तब्बल दहा दिवस सदर मार्ग बंद होता. परिणामी याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले. प्रशासन सर्तक होऊन मार्गावरील झाडे हटवून मार्ग सुरू करण्यात आला. दहा दिवसानंतर मार्ग सुरू झाल्याने नागरिकांनी लोकमतचे आभार मानले.
अखेर कोरची-कोटगूल मार्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 5:00 AM
कोरची-कोटगूल हा ३० किमी अंतराचा मार्ग आहे. या मार्गावर ग्रामीण भागातील बहुतांश गावे येतात. सदर मार्गावर छत्तीसगड राज्यातील पाटण, बंजारी, भुरकुंडी आदी गावे पडतात. सदर गावातील नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने याचा प्रसार होऊ नये म्हणून रस्त्यावर झाडे टाकून २५ मार्चपासून रस्ता अडविला होता.
ठळक मुद्देयंत्रणा पोहोचली : छत्तीसगड राज्याने सीमांवर चेकपोस्ट बसवून केली होती नाकेबंदी