लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : येथील प्राणहिता नदीच्या पुलापासून धर्मपुरी गावापर्यंतच्या ८०० मीटरचा रस्ता दुरूस्तीनंतर अवघ्या दोन महिन्यात खराब झाला. भेगा पडल्याने वाहनधारकांना त्रास होत होता. या संदर्भात लोकमतने अनेकदा वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाच्या वतीने सदर रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.प्राथमिकस्तरावर रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामात दर्जा ठेवण्यात आला नाही. याबाबतची तक्रार एका नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र त्यानंतरही काम सुरूच ठेवले. मात्र संपूर्ण काम दर्जाहिन झाल्याने दोन महिन्यात रस्ता जैसेथे झाला. तीन राज्यांना जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग सिरोंचा शहरापासून जातो.या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. जड वाहनांचीही दिवसभर वाहतूक सुरू असते. त्यामुळे सदर मार्गाची पक्की दुरूस्तीची मागणी नागरिकांसह अनेकांनी लावून धरली. लोकमतनेही सातत्याने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे पुन्हा या मार्गाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
अखेर सिरोंचात रस्ता दुरुस्तीचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 11:23 PM
येथील प्राणहिता नदीच्या पुलापासून धर्मपुरी गावापर्यंतच्या ८०० मीटरचा रस्ता दुरूस्तीनंतर अवघ्या दोन महिन्यात खराब झाला. भेगा पडल्याने वाहनधारकांना त्रास होत होता. या संदर्भात लोकमतने अनेकदा वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाच्या वतीने सदर रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.
ठळक मुद्देप्राणहिता पुलालगतच्या ५०० मीटर रस्त्याची दुर्दशा