भेंडाळा : चामाेर्शी तालुक्याच्या भेंडाळा येथे आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र नसल्यामुळे गावातील व परिसरातील शेतकऱ्यांनी आपले धान चामाेर्शी तालुका मुख्यालयी विक्रीसाठी न्यावे लागत हाेते. परिणामी प्रवास भाड्यापाेटी शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसत हाेता. आता गावातच शासकीय गाेदामात हमीभाव केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
भेंडाळा येथे आधारभूत हमीभाव खरेदी-विक्री संघ तालुका चामोर्शीच्या वतीने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. पाेलीसपाटील श्रीरंग मशाखेत्री यांच्या हस्ते बुधवारी पार पडले. या परिसरात धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्यामुळे भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांना आधारभूत धान खरेदी केंद्राची नितांत आवश्यकता होती. भेंडाळा येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्याने आधारभूत किमतीत धान विकणे शेतकऱ्यांना साेयीस्कर झाले आहे. सध्या हंगामी धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात आले असून, हा हमीभाव खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना धान विकणे सुलभ झाले आहे. या उद्घाटनाप्रसंगी राकेश पोरटे, मनोहर तुंबळे, देवेंद्र डांगे, संजय सोनटक्के, दुर्वास मशाखेत्री, प्रमोद सहारे, किशोर डांगे, तुळशीराम जुवारे, कैलास सातपुते, अशोक कोटांगले, सुधाकर उंदीरवाडे, विलास कुसराम, तसेच भेंडाळा परिसरातील बहुतांश शेतकरी वर्ग उपस्थित होता.