लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील विविध २९ महत्त्वपूर्ण समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने खासदार, आमदारांच्या पुढाकाराने राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १२ जून रोजी मुंबईच्या मंत्रालयात प्रमुख अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. या बैठकीत ना.मुनगंटीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील २९ समस्यांबाबत अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश दिले.या बैठकीला प्रामुख्याने खा.अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले गडचिरोली येथील जिल्हा स्टेडियम, चामोर्शी, धानोरा येथील क्रिडांगण, एसटीच्या विभागीय कार्यालय इमारत बांधकाम, चामोर्शी येथील एसटी बसडोपे, कोटगल बॅरेजचे काम, रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे सौंदर्यीकरण व इकोटुरीझमला मंजुरी देणे, कळमगाव बॅरेज, मार्र्कंडा देवस्थान पर्यटकन विकास आराखडा, चपराळा अभयारण्य विकास आराखडा, तळोधी उपसा सिंचन योजना, घोट येथील नवोदय विद्यालयाच्या जागेचा प्रश्न, गोंडवाना विद्यापीठाच्या विविध समस्या, वनहक्क पट्ट्यातील प्रलंबित प्रकरणे, गडचिरोलीतील तलावाचे सौंदर्यीकरण व हस्तांतरण, राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनीचे हस्तांतरण तसेच उद्योग निर्मिती आदींविषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अर्थमंत्र्यांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:34 AM
जिल्ह्यातील विविध २९ महत्त्वपूर्ण समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने खासदार, आमदारांच्या पुढाकाराने राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १२ जून रोजी मुंबईच्या मंत्रालयात प्रमुख अधिकाऱ्यांशी बैठक घेतली.
ठळक मुद्दे२९ समस्यांवर चर्चा : कार्यवाही करण्याचे मुनगंटीवारांचे निर्देश