लाॅकडऊनमुळे भोजनालये व इतर प्रतिष्ठाने बंद आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे मागील २७ दिवसापासून युवक काँग्रेसचे पदाधिकारी नियमितपणे जवळपास २०० लोकांना दोनवेळचे जेवण व दुपारी चहाची व्यवस्था करीत आहेत.
या सत्कार्यामध्ये काहीअंशी आपलाही सहभाग असावा म्हणून शुक्रवारी मराठा सेवा संघाने आपला सहभाग नोंदविला. १२ हजार रुपयाचे आर्थिक साहाय्य मराठा सेवा संघाचे दादाजी चापले, शालिग्राम विधाते, पांडुरंग नागापुरे, सुरेश लडके, राजेंद्र उरकुडे, विनायक बांदूरकर, अरुण काकडे, चंद्रकांत शिवणकर, मनोहर देशमुख, पी.पी. म्हस्के, त्र्येंबकराव करोडकर, दादाराव चुधरी, शेषराव येलेकर यांच्यातर्फे करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, रजनीकांत मोटघरे, डॉ. मेघा सावसाकडे, गौरव येनप्रेड्डीरवार, संजय चेन्ने, तोफिक शेख, रवी गराडे, कुणाल ताजने आदी उपस्थित हाेते.