ऑनलाईन लोकमतगडचिरोली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक जिल्ह्यांमधून गडचिरोली हा जिल्हा सर्वांगिण विकासासाठी निवडला आहे. अपेक्षित जिल्हा विकासाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी सर्वांनी पारंपरिक पध्दतीने कामे न करता नव्या मार्गाने गतिमान पध्दतीने काम करावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.पंतप्रधान आकांक्षित जिल्हा योजनेंतर्गत गडचिरोलीची निवड झाली आहे. या कालबध्द कार्यक्रमास १ एप्रिल २०१८ पासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरूवारी झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.या बैठकीस खा.अशोक नेते, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, आ.डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगिता पिपरे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डी.कनकरत्नम, जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रभारी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल आदी उपस्थित होते.देशात एकावेळी १०१ जिल्ह्यात हा कालबध्द विकास कार्यक्रम सुरु होत आहे. त्यात गडचिरोलीचा समावेश आहे. यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वत:चे लक्ष असणार आहे. मुख्यमंत्री देखील यात विशेष लक्ष देतील असे सांगून ना. अहीर म्हणाले, जिल्ह्यातील अधिकाºयांनी विकासाची दृष्टी ठेवून काम करावे यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. विकास करताना प्रथम उद्दीष्ट येथे घराघरात प्रत्येकाचे उत्पन्न वाढावे हा आहे. आपल्या मंत्रालयातर्फे नागरी कृती कार्यक्रम यासाठी राबविण्यात येत आहे. यातून आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय सुरक्षा दलाच्या माध्यमातून १७०० कुटुंबाना उपजिविकेचे साधन उपलब्ध करुन देण्यात आले आहे, असे ते म्हणाले.नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये मूलभूत साधन सुविधा निर्मितीसाठी देशातील काही जिल्ह्यांना केंद्रातर्फे तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. यातून गडचिरोली जिल्ह्यास ३३ कोटी रुपये मिळणार आहेत. याखेरीज पंतप्रधान आकांक्षित कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ४३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद राज्य शासनाने केली आहे, असे त्यांनी सांगितले. रस्ते बांधणीसाठी पहिला टप्प्यात २२९ कोटी रुपये देण्यात आले तर आता दुसºया टप्प्यात २३९ कोटी रुपये दिले जाणार आहे. नक्षलग्रस्त भागात अधिकाधिक दुर्गम क्षेत्रात असणाºया पोलीस दलाच्या जवानांसाठी मोबाईल कनेक्टीविटी महत्वाची आहे. यासाठी बीएसएनएलने गतिमान पध्दतीने टॉवर उभारणी करावी व पोलीस दलाच्या गरजेनुसार नेटवर्क उभारावेत, असे निर्देश अहीर यांनी दिले. बैठक जिल्हाधिकारी घेऊन या कार्यक्रमास गती देतील, असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन नियोजन अधिकारी अनिल गोतमारे यांनी केले. बैठकीला विविध विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयांच्या बळकटीकरणाला प्राधान्य द्याआकांक्षित कार्यक्रमांतर्गत जे घटक ठरविण्यात आले आहेत त्यात आरोग्यास प्राधान्य आहे. रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यासोबत रिक्त पदे भरण्यास आरोग्य विभागाने प्राधान्य द्यावे, असे ना. अहीर म्हणाले. शालेय शिक्षणात गडचिरोलीची स्थिती चांगली आहे. मात्र २०१२ पासून भरती प्रक्रिया बंद असल्याने शिक्षकांची २०० पदे रिक्त आहेत. ती आता भरण्यात येतील, असे सांगितले. केंद्र प्रमुखपदी पदोन्नती व बंगाली शाळांचे शिक्षक याबाबत आमदार डॉ. होळी यांनी बैठकीत मागणी केली. आरंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पॉवर पॉर्इंट सादरीकरणद्वारे या कार्यक्रमाचा उद्देश व निकष यांची माहिती दिली. विविध विकास घटक विचारात घेऊन यात जिल्ह्यांची क्रमवारी निश्चित करण्यात येणार आहे. आरंभीच्या स्थितीत गडचिरोली या १०१ जिल्ह्यात १४ व्या स्थानी आहे. राज्यातील वाशिम ११ व्या तर नंदूरबार ३९ व्या स्थानावर आहे.गटशेतीच्या प्रस्तावास निधी देणारजिल्ह्यात ११ आदिवासी शेतकरी गटांना कृषी पंप पुरवण्यात आले आहेत. येणाºया काळात गटशेतीच्या कार्यक्रमास गती द्यावी, असे निर्देश अहीर यांनी दिले. यासाठी शासन प्रत्येक गटामागे एक कोटी रुपये देते. असे ६०० प्रस्ताव सध्या आहे. आणखी कितीही प्रस्ताव आले तर त्यासाठी आपण निधी देऊ, असे अहीर म्हणाले.४९ गावांत पडला सौरऊर्जेचा प्रकाशवीज पुरवठ्याअभावी केवळ ९१.८७ हेक्टर क्षेत्र सध्या लघुसिंचनाखाली आहे. शेतीपंपाची सर्व प्रलंबित जोडणी तत्काळ देण्यात यावी, असे निर्देश अहीर यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात २६७ गावे विद्युत पुरवठ्याविना आहेत. यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. २१८ गावे वीज वितरण कंपनीच्या अंतर्गत आहेत. ५९ गावे शिल्लक आहेत तसेच ४९ गावांना सौर उर्जेने वीज पुरवठा करण्यात येणार आहे. उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या सूचना ना. अहीर यांनी दिल्या.
विकासाचा नवा मार्ग शोधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:04 AM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक जिल्ह्यांमधून गडचिरोली हा जिल्हा सर्वांगिण विकासासाठी निवडला आहे.
ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे प्रतिपादन : पंतप्रधान आकांक्षित जिल्हा योजनेत गडचिरोलीचा समावेश