जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वाढत्या कोराेना रुग्णांच्या संख्येवर आळा बसावा याकरिता मास्क लावणे बंधनकारक केले आहे. कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एखादा नागरिक मुजोरी करीत असेल तर त्याच्यावर फौजदारी कारवाईचेही आदेश आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ४ मार्च रोजी धानोरा येथील महसूल विभागाच्या पथकाने शहरात फिरून नागरिकांना मास्क वापरण्याविषयी जनजागृती केली. तसेच जे नागरिक मास्कविना आढळून आले त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. १ ते ४ मार्चपर्यंत धानोरा तालुक्यातून २५ हजार ४०० रुपये दंड वसूल केला.
धानोरा येथील पथकात नायब तहसीलदार धनराज वाकुडकर, वणीश्याम येरमे, तलाठी अविनाश कोडपे, एस. के. श्रीरामे, सुनील कोवे, इंदू कोवा, नरेश हरामी, अनिल कुलमेठे, गणेश नरोटे यांचा समावेश आहे.