तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, नगरपंचायत या कार्यालयांची चार पथके तैनात आहेत. विनामास्क फिरणारे वाहनधारक, पादचारी नागरिकांकडून दंड वसूल केला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. आपल्याही शहरात रुग्णांची संख्या वाढू शकते. ती वाढू नये, त्यावर नियंत्रण यावेृ याकरिता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
चामोर्शी शहरात चार पथके तयार करण्यात आली असून, प्रत्येक पथकात दोन पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. ही पथके दररोज शहरात फिरतात. लक्ष्मी गेट येथेही पथके कार्यरत असून शारीरिक अंतर व मास्क वापर याकडे लक्ष ठेवून आहेत. तहसीलदार जितेंद्र सिकतोडे, मुख्याधिकारी सतीश चौधरी, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनात ही पथके कार्यरत आहेत. नायब तहसीलदार दिलीप दूधबळे हे पथक प्रमुख म्हणून काम करीत आहेत. सहायक पुरवठा निरीक्षक गौरव भांडेकर, विराज वासेकर, विलास निरगुडे, मंडळ अधिकारी संतोष श्रीरामे, तलाठी नरेंद्र मेश्राम, जयश्री कुळमेथे, सुधीर बावीसकर, महेश मडावी, नागेश सेडमाके, ओंकार शहारे, नितीन मेश्राम, नगरपंचायत कर्मचारी रमेश धोडरे, मोहमद हाफिज सय्यद, विजय पेद्दीवार, संतोष भांडेकर, दिलीप लाडे, प्रभाकर कोसरे, बाळा धोडरे कार्यरत आहेत.