लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टीला तालुका घोषित करावा व आष्टीतील पेपरमिल सुरू करावी, या मागणीसाठी सोमवारी आष्टी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला.माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मराव प्रकाश कुकुडकर, राकेश बेलसरे यांच्या नेतृत्वात सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने, चहाटपरी, पानठेले, शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आली.चामोर्शी या तालुका स्थळापासून आष्टीचे अंतर जवळपास ३० किमी आहे. आष्टीच्याही पलिकडे काही गावे येतात. या गावांना चामोर्शी हे तालुकास्थळ जवळपास ५० किमी पडते. एवढ्या दूर अंतरावरून जाऊन तालुकास्थळी कामे करणे शक्य होत नाही. परिणामी अनेक नागरिक या योजनांपासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन आष्टीला तालुकास्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागील २० वर्षांपासून मागणी आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व इतर नागरिकांनीही शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. तालुक्याच्या दृष्टीने सर्वसोयीसुविधा आष्टी येथे आहेत. आष्टीला तालुकास्थळाचा दर्जा दिल्यास परिसरातील जनतेला चामोर्शी येथे जाण्याचे कष्ट करावे लागणार नाही.परिसरातील अनेक ग्रामपंचायतींनी आष्टीला तालुक्याचा दर्जा द्यावा, असा ठराव घेतला आहे. मात्र या सर्व पाठपुराव्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. २६ जानेवारी रोजी आष्टीला तालुका घोषित करावा, या मुख्य मागणीसाठी बंद पाळण्यात आला. सर्वपक्षिय नेत्यांनी एकत्र येत बंदला पाठींबा दर्शविला. तसेच समाजातील इतर व्यक्तींनीही बंदला प्रतिसाद दिल्याने कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद यशस्वी करण्यात आष्टीच्या सरपंच वर्षा देशमुख, हंसप्रित राऊत, ग्रा.पं. सदस्य सत्यशील डोर्लीकर, कपिल पाल, विठ्ठल आवारी, संतोष बारापात्रे, अतुल तांगडे, तंमुस अध्यक्ष रोहन रायपुरे, छोटू दुर्गे व गावकऱ्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
आष्टीत पाळला कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:12 PM
आष्टीला तालुका घोषित करावा व आष्टीतील पेपरमिल सुरू करावी, या मागणीसाठी सोमवारी आष्टी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला.
ठळक मुद्देतालुक्याचा दर्जा देण्याची मागणी : सर्वपक्षीय नेते व नागरिकांचा पुढाकार