लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील २९१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी आणि गुरूवारी ग्रामपंचायतनिहाय सरपंचांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. दरम्यान ज्या जात वैधता प्रमाणपत्राच्या अटीमुळे मोठा पेच निर्माण झाला होता त्या अटीत शिथिलता देत निवडणूक आयोगाने गुरूवारी (दि.१२) नवीन आदेश काढला. त्यानुसार जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना एक वर्षाची मुदत दिली आहे.विशेष म्हणजे मतदानाची तारीख दि.२९ वरून ३१ मार्च करण्यात आली. यासोबतच नामांकन दाखल करण्याची मुदतही वाढवून देऊन ती दि.१३ वरून १६ मार्च केली आहे. त्यामुळे नामांकन दाखल करण्यासाठी प्रत्यक्षात दोन दिवस अतिरिक्त मिळणार आहेत.चामोर्शी, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी, आरमोरी या पाच तालुक्यांमधील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या परिसरात उमेदवार व गावातील नागरिकांनी उत्सुकतेपोटी चांगलीच गर्दी केली होती. आता पुढील ३ दिवस नामांकन प्रक्रियेला वेग येणार आहे.शेकडो नामांकन दाखलग्राम पंचायत निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या कामाला बुधवारपासून गती आली आहे. जिल्हाभरात तालुकास्थळी गुरूवारपर्यंत शेकडो नामांकन दाखल करण्यात आले. गडचिरोली तालुक्यात गुरूवारपर्यंत एकूण ७७ नामांकन आले. सिरोंचा तालुक्यात १०६, आरमोरी तालुक्यात ५२, कोरची तालुक्यात ५१, कुरखेडा तालुक्यात २०६, धानोरा तालुक्यात ८५, एटापल्ली तालुक्यात ११२ नामांकन दाखल झाले आहेत.
सर्व सरपंचांची आरक्षण सोडत पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 6:00 AM
विशेष म्हणजे मतदानाची तारीख दि.२९ वरून ३१ मार्च करण्यात आली. यासोबतच नामांकन दाखल करण्याची मुदतही वाढवून देऊन ती दि.१३ वरून १६ मार्च केली आहे. त्यामुळे नामांकन दाखल करण्यासाठी प्रत्यक्षात दोन दिवस अतिरिक्त मिळणार आहेत. चामोर्शी, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी, आरमोरी या पाच तालुक्यांमधील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
ठळक मुद्देनामांकनासाठी १६ पर्यंत मुदतवाढ : जात वैधता प्रमाणपत्राची अट शिथिल केल्याने इच्छुक उमेदवारांना दिलासा