सगणापुरातील घटना : मदत देण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्यातील सगणापूर येथे मंगळवारी दुपारी ११ वाजताच्या सुमारास दुकानांना आग लागली. या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली आहेत. सुभाष अक्कलवार व संजय कोम्मावार यांच्या दुकानांना आग लागल्याचे माहित होताच गावातील नागरिकांनी पाण्याच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही. दोन्ही दुकाने जळून खाक झाली. याबाबतची माहिती तलाठी यांना देण्यात आली. तलाठ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जिल्हा परिषद सदस्या कविता प्रमोद भगत यांनी सुध्दा भेट दिली. यावेळी त्यांचेसोबत पं.स. सदस्य धर्मशीला सहारे, सरपंच दिगांबर धानोरकर उपस्थित होते. या दुकानदारांना आकस्मिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आगीत दोन दुकाने जळून खाक
By admin | Published: May 24, 2017 12:28 AM