रामचंद्रम दंदेरा यांचा कोंबडी विकण्याचा व्यवसाय आहे. त्यांचे घर या आगीत पूर्णपणे जाळून खाक झाले. त्यांच्या जवळपास ३० कोंबड्या या आगीत मरण पावल्या. त्यांच्या घराला लागून असलेल्या समया गोंढे यांच्या घरालाही आग लागली. त्यांच्या घरातील साहित्य अर्धवट जळाले.
घरांना आग लागल्यावर गावातील नागरिक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला.
मंडळ निरीक्षक किशोर भुदे, तलाठी आर.बी. मून, कोतवाल लक्ष्मण इंडला, ग्रामविकास अधिकारी आदींनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. महसूल विभागाला अहवाल देऊन नुकसानभरपाई देण्याचे प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी प्रकाश बंडावार, उपसरपंच सतीशकुमार चिप्पा, महेश गंजी, चेतन व्यासमनेनी, श्रीहरी अरिगेला, अशोक सामला, नागेश अरिगेला, कार्तिक जनगाम, देवेंद्र रंगू, सूरज दुदी आदी गावकरी व युवकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. नुकसानग्रस्त नागरिकांना योजनेतून घरकुल मंजूर करावे, तसेच नुकसानभरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.