चामोर्शी : येथील ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यापासून शहरवासीयांकडून अग्निशमन व्यवस्थेची मागणी केली ाजात होती. नगरपंचायत प्रशासनाने त्याची दखल घेतल्याने आता अग्निशमन वाहनही दाखल झाले आहे. ७२ लाख ७२ हजार रुपये किमतीच्या या वाहनासाठी लवकरच मनुष्यबळही उपलब्ध केले जाणार आहे.
अग्निशमन सेवेचे बळकटीकरण करण्यासाठी सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात अग्निशमन वाहन खरेदी करण्यास मुंबईच्या अग्निशमन बोर्डाकडून १८ जून २०२० ला तांत्रिक मान्यता मिळाली होती. तर जिल्हाधिकारी यांचेकडून २८ जानेवारी २०२१ ला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ७२ लाख ७२ हजारांची किंमत असलेल्या अग्निशमन वाहन खरेदीची निविदा मुंबईच्या निधी इंटरप्रायजेसला मिळाली होती.
नगर पंचायत मुख्याधिकारी सतीश चौधरी यांनी या वाहनासोबत नेमके किती कर्मचारी असणार हे निश्चित सांगता येणार नाही, परंतु डायरेक्टर ऑफिसकडून नगरपंचायतीला आकृतीबंधानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. तसेच आग्निशमन गाडी पुरवठा कंपनीचे इंजिनियर येऊन न.प. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देणार आहेत. सद्यस्थितीत न.प.चे जुने कर्मचारी देखभाल करतील असे सांगितले.
(बॉक्स)
वेळ वाचून हानी टाळता येणार
या अग्निशमन वाहनाची क्षमता २५०० लिटर असून केमिकल फायबर, पेट्रोलियम फायर, आदी सर्व प्रकारच्या आगी विझविण्यासाठी हे वाहन उपयुक्त ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चामोर्शीकरांकडून अग्निशमनची सुविधा असावी अशी मागणी होती. नगरपंचायत प्रशासनाकडे अग्निशमन वाहन उपलब्ध नसल्याने उन्हाळ्यात आगीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी अडचण येत होती. आग लागल्यास गडचिरोली, मूल येथील अग्निशमन वाहन मागवावे लागत होते. मात्र तोपर्यंत वेळ निघून जात होती. आता या वाहनामुळे संभावित वित्त व जीवितहानी नियंत्रणात आणता येऊ शकते.
===Photopath===
260521\4213img-20210525-wa0127.jpg
===Caption===
चामोर्शि नगरपंचायत ला मध्ये अग्निशामक वाहन दाखल