पहिल्या प्रवेश फेरीसाठी १६ सप्टेंबरपर्यंत विकल्प अर्ज भरून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. १८ला जागावाटप हाेणार आहे. १९ ते २३ पर्यंत संबंधित संस्थेत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर २४ सप्टेंबरपासून दुसऱ्या फेरीला सुरूवात हाेईल. २४ला रिक्त जागांचा तपशिल, २५ ते २८ पर्यंत ऑप्शन फाॅर्म भरणे, ३०ला जागावाटप, १ ते ६ ऑक्टाेबरपर्यंत संबंधित संस्थेत भेट देऊन प्रवेश निश्चित करावा लागेल. तसेच याच दिवसापासून शैक्षणिक सत्राची सुरुवात हाेईल. रिक्त जागा असल्यास संस्थास्तरावरील प्रवेश फेरी ७ ते १३ ऑक्टाेबरपर्यंत हाेईल. १३ ऑक्टाेबरपर्यंत संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे, याची नाेंद घ्यावी. विशेष म्हणजे, शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सुविधा केंद्र निर्माण करण्यात आले आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना नि:शुल्क सुविधा व मार्गदर्शन केले जाते. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डाॅ. अतुल बाेराडे यांनी केले आहे.
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये १३पासून पहिली प्रवेश फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:44 AM