२७३ विद्यार्थी उत्तीर्ण : तिन्ही शाळांचा निकाल १०० टक्के गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सीबीएसई पॅटर्न दहावीच्या तीन शाळा असून या शाळांमधून २७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान गडचिरोली येथील स्कूल आॅफ स्कॉलरची विद्यार्थिनी सलोनी मेश्राम हिने मिळविला आहे. तिला ९७.०२ टक्के गुण मिळाले आहे. जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय घोट, स्कूल आॅफ स्कॉलर गडचिरोली व कारमेल हायस्कूल गडचिरोली या तिन्ही शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. जवाहर नवोदय विद्यालयातून ७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये सुशील सपन रॉय व दीपमा पुरूषोत्तम देशकर हे दोन विद्यार्थी सीजीपीए १० मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तर स्कूल आॅफ स्कॉलर गडचिरोलीमधून १०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, हे सर्व उत्तीर्ण झाले. यामध्ये सलोनी मेश्राम ९७.०२ टक्के, अजिम पंजवानीला ९७ टक्के, सूर्यकांत मुडके याला ९७ टक्के तर वैष्णवी आखाडे हिला ९६.०८ टक्के गुण मिळाले आहे. कारमेल विद्यालयातूनही १०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, ते सर्व उत्तीर्ण झाले आहे.स्कूल आॅफ स्कॉलर शाळेतून १६ विद्यार्थी सीजीपीए टॉप टेनमध्ये आले आहे. या १६ विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयात ९० पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहे. या शाळेतील ३७ विद्यार्थी ए-१, ३३ विद्यार्थी ए-२ मध्ये आले आहेत. बी-१ श्रेणीत २८ तर बी-२ श्रेणीत ३ विद्यार्थी आले आहेत. स्कूल आॅफ स्कॉलर या शाळेने दरवर्षीप्रमाणे यंदाही यशाची परंपरा कायम ठेवली. या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन तसेच पेढे भरवून शाळेतर्फे शनिवारी सत्कार करण्यात आला. यावेळी स्कूल आॅफ स्कॉलरच्या प्राचार्य उषा रामलिंगम, पर्यवेक्षक निखिल तुकदेव यांच्यासह गणेश पारधी, शैलेश आकरे, अमोल चापले, महेंद्र बोकडे आदी शिक्षक उपस्थित होते. घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. या शाळेतून ७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेचे १० विद्यार्थी सीजीपीए टॉपटेनमध्ये आले आहे. यामध्ये सुशील रॉय, दीपम देशकर, कृणाल सरदारे, संघदीप सहारे, प्रणोती उराडे, पौर्णिमा दुर्गे, लोकेश मार्गिया, हितेश थोटे, चैताली गावंडे, शितल झोडे यांचा समावेश आहे. कारमेल हायस्कूलमधून प्रथम येण्याचा मान श्रेयस रामचंद्र झंझाळ याने पटकाविला. त्याला ९६.०८ टक्के गुण आहे. या शाळेतून १८ विद्यार्थी ९० टक्क्याच्या वर गुण घेऊन उत्तीर्ण झाले. (जिल्हा प्रतिनिधी)
एसओएसची सलोनी मेश्राम जिल्ह्यातून प्रथम
By admin | Published: May 29, 2016 1:29 AM