मासळी बाजारामुळे आवागमनात अडथळे (बाजार पूर्ववत नियोजित जागेवरच भरविण्यात यावा)
कुरखेडा : शहराचा मासळी बाजार सध्या सती नदीच्या किनाऱ्यावर कुरखेडा-कोरची-मालेवाडा या मुख्य महामार्गावर भरविण्यात येत आहे. या ठिकाणी रस्त्यावरच ग्राहकांची वाहने उभी राहतात, तसेच येथे ग्राहकांची गर्दी होत असल्याने आवागमनात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे हा बाजार पूर्ववत नियोजित जागेवरच भरविण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
लॉकडाऊनमुळे पूर्वी सकाळी ११ वाजेपर्यंतच बाजार सुरू ठेवण्याची सक्ती होती. त्यामुळे मासळी व्यावसायिकांनी येथील बाजार तात्पुरत्या स्वरूपात शहराच्या हद्दीबाहेर सती नदीच्या किनाऱ्यावर हलविला होता. मात्र आता बाजार सायंकाळपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा मिळालेली आहे. हा बाजार शहराच्या हद्दीबाहेर भरत असल्याने शहरवासीयांना अडचणीचा ठरत असून नगरपंचायतचा महसूलसुद्धा बुडत आहे. मोठी वाहतूक असलेल्या मार्गावर आवागमनातही अडथळे निर्माण होत आहेत. सदर अडचण लक्षात घेता येथील मासळी बाजार पूर्ववत बाजारपेठेत असलेल्या चिकन मार्केट समोर भरविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
110721\img-20210709-wa0113.jpg~110721\img-20210709-wa0115.jpg
मच्छी बाजारामूळे निर्माण झालेली वाहतूकिची कोंडी~बाजारात असे अस्ताव्यस्त वाहने उभी करण्यात येतात