लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरात नदी, नाले, तलाव, बोड्यांची संख्या मोठी आहे. तसेच मासेमारी व्यवसाय करणाऱ्या केवट-भोई-ढिवर समाज बांधवांची संख्या बºयापैकी आहे. या समाजबांधवांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन मासेमारी व्यवसाय आहे. मात्र चामोर्शी शहरासह तालुक्यातील बºयाच तलावांना जलपर्णी वनस्पतीने विळखा घातला आहे. परिणामी याचा परिणाम पाणी साठवणुकीसह मासेमारी व्यवसायावर होत आहे.स्थानिक प्रशासनामार्फत चामोर्शी शहरातील या गाव तलावाचा दरवर्षी लिलाव केला जातो. लिलावानंतर तलावाची मालकी प्राप्त झालेल्या मत्स्य सहकारी संस्था तसेच नागरिक पावसाळ्यात मत्स्यबीज टाकतात. साधारणता दिवाळी व मकरसंक्रांतीनंतर या मत्स्यबीजाची बºयापैकी वाढ होते. यंदाही चामोर्शीच्या गाव तलावात मासोळ्याचे प्रमाण चांगले आहे. मात्र या तलावाला जलपर्णी वनस्पतीने विळखा घातल्यामुळे मासेमार बांधवांना मासे पकडण्यासाठी तलावात योग्य प्रकारे जाळे टाकता येत नाही. त्यामुळे शहरातील मासेमार बांधव त्रस्त झाले आहेत.सध्या या तलावात संपूर्ण क्षेत्रात जलपर्णी वनस्पती वाढली असल्याने संपूर्ण तलाव हिरवेगार दिसून येत आहे. सिंचन विभागाने या तलावातील गाळाचा पूर्णता उपसा करून जलपर्णी वनस्पतीची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे, अशी मागणीही शहरातील केवट-ढिवर व भोई समाज बांधवांकडून होत आहे. सदर तलावाचा उपयोग महिलांना कपडे धुण्यासाठी होत आहे. अनेक पशुपालक या तलावात आपले जनावरे नेऊन स्वच्छ करीत आहेत. गणपती, शारदा, दुर्गा उत्सवादरम्यान याच तलावात गणपती, शारदा, दुर्गा मूर्तीचे तसेच गौरीचे विसर्जन केले जाते. त्यामुळे या गाव तलावाला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रशासनाने चामोर्शी लगतच्या या गाव तलावातील गाळ उपसा करून जलपर्णी वनस्पतीची विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे.
तलावातील वाढत्या जलपर्णीने मासेमारी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:46 PM
चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरात नदी, नाले, तलाव, बोड्यांची संख्या मोठी आहे. तसेच मासेमारी व्यवसाय करणाऱ्या केवट-भोई-ढिवर समाज बांधवांची संख्या बºयापैकी आहे. या समाजबांधवांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन मासेमारी व्यवसाय आहे.
ठळक मुद्देचामोर्शी येथील तलाव । सिंचन विभागाचा कानाडोळा