भर पावसातही धाडी : देसाईगंज, कुनघाडा रै. येथे देसाईगंज व चामोर्शी पोलिसांची कारवाई देसाईगंज/चामोर्शी : लाखांदूरवरून आमगाव मार्गे मारोती कारमध्ये आणली जाणारी ६५ हजार रूपये किंमतीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. सदर कारवाई ७ जुलैच्या रात्री करण्यात आली आहे. चामोर्शी पोलिसांनी ८ जुलै रोजी कुनघाडा रै. येथील दारूविक्रेत्यांवर धाड टाकून ६७ हजार २०० रूपयांची दारू जप्त केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के व टास्क फोर्सचे पोलीस उपनिरीक्षक एम. एम. पवार, पोलीस हवालदार संतोष धोटे, नायक पोलीस शिपाई वसंत जौंजाळकर, पोलीस शिपाई रवी मडावी व पोलीस हवालदार सुरेश कवाडकर यांनी देसाईगंज पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या प्रोव्हिबिशन रेडच्या निमित्ताने सापळा रचला. सिल्वर रंगाची मारोती कारला अडवून तिची तपासणी केली असता, या कारमध्ये खरड्याच्या खोक्यामध्ये देशी व विदेशी कंपनीनीची दारू आढळून आली. यामध्ये सुपर सानिक रॉकेट संत्रा कंपनीचे १२ बॉक्स आढळले. त्यांची किंमत २८ हजार ८०० रूपये आहे. देशी दारू सुप्रीम नंबर १ कंपनीचे १५ बॉक्स आढळले. त्याची किंमत ३६ हजार रूपये आहे. त्याचबरोबर ३ लाख ५० हजार रूपये किंमतीची दारू जप्त केली आहे. देसाईगंज पोलिसांनी अवैध दारूच्या विरोधात मोहीम उघडली आहे. त्यामुळे दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.तीन आरोपी फरारचामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवचर, पोलीस उपनिरीक्षक गोयल गोपाल ढोले, राजेश घुटके, दलाल मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संतोष भांडेकर, नितीन पाल यांनी कुनघाडा रै. येथील दारूविक्रेत्यांवर धाड टाकली असता, ६७ हजार २०० रूपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. यातील प्रीती उमेश रामटेके रा. कुनघाडा या महिला आरोपीला पोलिसांनी अटक केली. तर शोभा गुरूदेव भुरसे रा. तळोधी, सपन सतीश मंडल, नीलेश मारोती टिकले दोघेही रा. कुनघाडा हे तीन आरोपी फरार आहेत. आरोपींच्या विरोधात चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या आरोपींवर यापूर्वीही दोन ते तीन वेळा धाड टाकून दारू जप्त करण्यात आली.गडचिरोलीत वाहनासह ९३ हजारांचा माल जप्तगडचिरोली टास्क फोर्सच्या पथकाद्वारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विश्रामपूर फाट्यावर पाळत ठेवून गुरूवारी दुचाकी वाहनासह ९३ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात आरोपी उत्तम अजीत मंडल, अनुकूल कमरेश मंडल रा. पीव्ही ११३ ता. पाखांजूर जि. कांकेर (छत्तीसगड) यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. विश्रामपूर फाट्यावर दुचाकी क्र. एमएच-३३-एन-१६१६ ची तपासणी केली असता, वाहनावरील पोत्यात १८० एमएलच्या ४२ हजार २०० रूपये किंमतीच्या १४४ निपा आढळल्या व ५० हजाराचे वाहन पोलिसांनी जप्त केल्या. आरोपी शशिकांत मंडल फरार असून त्याचा शोध सुरू आहे. सदर कारवाई एसडीपीओ डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शना पीएसआय सतीश सिरसाठ, राजेंद्र तितीरमारे, विजय राऊत, दीपक डोंगरे यांनी केली.
कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
By admin | Published: July 09, 2016 1:33 AM