लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पाचवी व आठव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. यापूर्वी ही परीक्षा २५ एप्रिल राेजी घेण्याचे निश्चित करण्यात आले हाेते. मात्र राज्यभरात वाढत असलेले काेराेनाचे रूग्ण लक्षात घेता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ती आता २३ मे राेजी घेतली जाणार आहे.प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शाेध घेता यावा यासाठी पाचवी व आठव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसावेत यासाठी शिक्षण विभागामार्फत प्रयत्न केले जातात. परीक्षा शुल्क कमी राहते. शाळेचे मुख्याध्यापकच परीक्षेचा अर्ज भरून देतात. तसेच गावाजवळच्या शाळेतच परीक्षा केंद्र राहते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसतात. जिल्हाभरातील जवळपास पाच हजार विद्यार्थी ही परीक्षा देतात. ही परीक्षा २५ एप्रिल राेजी निश्चित करण्यात आली हाेती. मात्र काेराेनाचे रूग्ण वाढत असल्याने आताच परीक्षा घेणे धाेक्याचे ठरू शकते ही बाब लक्षात घेऊन आता ही परीक्षा २३ मे राेजी पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुन्हा काही दिवसांचा कालावधी मिळणार आहे. १० एप्रिलपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.
अभ्यास करण्यास मिळाला महिनामहिनाभराने शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यास करण्यासाठी महिनाभराचा कालावधी मिळाला आहे. शाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थी केवळ शिष्यव्त्तीचा अभ्यास करतील.
काेराेनाचे कारण देत पुढे ढकलली परीक्षा
सध्या राज्यात काेराेनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. काेराेनाची लाट आता काही दिवस पुन्हा कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २३ मे राेजी परीक्षा हाेणार आहे. ताेपर्यंत काेराेनाची काय स्थिती राहते. त्यावरून पुन्हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पाचवी व आठव्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी परीक्षा देतात. वयाने हे विद्यार्थी लहान आहेत. परीक्षा केंद्रांवर गर्दी हाेणार नाही. याची खबरदारी घेण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज आहे. परीक्षा पास हाेण्यासाठी प्रत्येक विषयात ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.मात्र केवळ परीक्षा पास झाला तर शिष्यवृत्ती मिळत नाही. त्यासाठी प्राविण्यप्राप्त गुण मिळवावे लागतात. प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्याला दरमहा जवळपास १०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.