लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील कोरची तालुक्याच्या छत्तीसगड सीमेकडील दुर्गम भागात असलेल्या ग्यारापत्तीच्या जंगलात मंगळवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यानंतर नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. मात्र त्यांच्या रायफलसह दैनंदिन वापरातील बरेच साहित्य पोलिसांच्या हाती लागले.प्राप्त माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी एटापल्ली तालुक्यात छत्तीसगडमधील दोन गावकऱ्यांची नक्षल्यांनीनी गळा कापून हत्या केल्यानंतर नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या पथकाने छत्तीसगड सीमेवर ‘आॅपरेशन ग्रीन हंट’ सुरू केले. त्याअंतर्गत ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्रांतर्गत छत्तीसगडकडील सीमावर्ती भागात पोलिसांचे सी-६० पथक गस्त करीत होते. मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पोलिसांची चाहूल लागताच जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर दिले. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पळून गेले. यानंतर त्या परिसरात पोलिसांनी शोध घेतला असता एक रायफल, वॉकीटॉकी, औषधे, गणवेश व काही जीवनावश्यक वस्तू मिळाल्या. त्यानंतर आॅपरेशन ग्रीन हंट आणखी तीव्र करण्यात आल्याचे पोलीस सूत्राने सांगितले.
छत्तीसगड सीमेवरील जंगलात चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 12:50 PM
जिल्ह्यातील कोरची तालुक्याच्या छत्तीसगड सीमेकडील दुर्गम भागात असलेल्या ग्यारापत्तीच्या जंगलात मंगळवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यानंतर नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले.
ठळक मुद्देनक्षल्यांचे साहित्य जप्तदोघांच्या हत्येनंतर पोलिसांचे आॅपरेशन ग्रीन हंट